आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

विंझरमध्ये गुलाब व पेन देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना दिला आत्मविश्वासाचा संदेश


राजगड तालुक्यातील विंझर येथे इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत करण्यात आले. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा तणाव कमी व्हावा आणि त्यांना सकारात्मक वातावरण मिळावे, या उद्देशाने केंद्र प्रशासनाच्या वतीने गुलाबपुष्प व पेन देऊन स्वागत करण्यात आले.

 

या उपक्रमात केंद्रसंचालक भगवान बेल्हेकर, उपकेंद्र संचालक तानाजी सांगळे, सहाय्यक परिरक्षक रामदास पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण भोसले, सरपंच सविता दसवडकर, योगेश लिम्हण, मोहन दसवडकर, केंद्रप्रमुख बाळासाहेब शेख, स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे संतोष कदम, गणेश चाळेकर, गणेश भोसले, प्राध्यापिका जयश्री रासकर, शिक्षक वसंत कराड, दीपक कुवर, नरेंद्र गावित, संजय सानप, संजय चौधरी, दिलीप राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

 

राजगड तालुक्यातून यंदा एकूण ४२२ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. त्यापैकी सरस्वती विद्यालय, आंबवणे येथील केंद्रावर १६७ विद्यार्थी परीक्षेला बसले असून या केंद्राचे कामकाज केंद्रसंचालक अनिल गरड व उपकेंद्र संचालक महादेव पापळ पाहत आहेत. तर न्यू इंग्लिश स्कूल, विंझर येथील केंद्रावर २५५ विद्यार्थी परीक्षेला बसले असून येथे केंद्रसंचालक भगवान बेल्हेकर व उपकेंद्र संचालक तानाजी सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा सुरळीत पार पडत आहे.

 

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास व उत्साह दिसून येत होता. गुलाब व पेनसारख्या छोट्या पण अर्थपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून, परीक्षा शांततेत व शिस्तीत पार पाडण्यासाठी केंद्र प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. परीक्षेच्या काळात सहकार्य केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे आभार मानले.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!