भोर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, भोर तालुका (एक तालुका, एक जयंती) यांच्या वतीने विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.
या महोत्सवांतर्गत सामूहिक बुद्धवंदना, भव्य मिरवणूक व शोभायात्रा, व्याख्यानमाला, अभिवादन सभा, आरोग्य शिबिर (निमा), अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पथनाट्य, आंबेडकरी जलसा (भोर तालुका सिंगर ग्रुप) तसेच सामूहिक भोजन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमातून “छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला स्वराज्य दिले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून त्या स्वराज्याला बळ दिले,” असा प्रभावी संदेश देण्यात आला.
यावेळी भोर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिकेसाठी २.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली. अभिवादन सभेत दिवंगत नेते अजितदादा पवार यांनी आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर केल्याची माहिती रणजितदादा शिवतरे, नगराध्यक्ष नाना आवारे व गटनेते केदार देशपांडे यांनी दिली.
या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजितदादा शिवतरे, सदस्य विक्रमदादा खुटवड, प्रविणशेठ जगदाळे, नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे, सभापती मनिषाताई कंक, उपसभापती विशाल बंटी कोंडे, गटनेते केदार देशपांडे, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, मुख्याधिकारी गजानन शिंदे, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
तसेच राजेश बोडके, कुणाल धुमाळ, अनिल भेलके, संतोष कंक, संदीप शेटे, प्रशांत पडवळ, मारूती गोरे, डॉ. अरुण बुरांडे, डॉ. इम्रान खान, डॉ. राजेश धिवार, नेहा डोंबे, परवेझ शेख, सोमनाथ ढवळे, बाळासाहेब खुटवड, बाळा शेटे, विद्याधर कांबळे, गौतम शेलार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
महोत्सवाचे आयोजन अविनाश गायकवाड, राजन घोडेस्वार, गणेश साळुंके, अरुण रणखांबे, अक्षय गायकवाड, रणजीत रणखांबे, मयूर गायकवाड, नितीन माने, निलेश घोडेस्वार, सतीश गायकवाड, संतोष जाधव, सिद्धोधन कांबळे, प्रकाश ओव्हाळ, स्वप्निल सावंत, विशाल शाक्य, महेंद्र सपकाळ, सुनील गायकवाड, श्रीकांत जाधव, अमोल भालेराव, विकास सपकाळ, दीपक गायकवाड, अनिल गायकवाड, युवराज शेलार, अंकुश साळुंके आदी कार्यकर्त्यांनी यशस्वीपणे केले.

प्रास्ताविक मयूर गायकवाड यांनी केले, सूत्रसंचालन राजन घोडेस्वार यांनी केले तर आभार अविनाश गायकवाड यांनी मानले.









