आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

श्रीनाथ ज्वेलर्सवरील दरोडा काही तासांत उघड; चार आरोपींना अटक राजगड पोलिसांची मोठी कारवाई; पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या पथकाला यश


खेड शिवापूर : कोंढणपूर रोडलगत श्रीरामनगर (बांडेवाडी) येथील श्रीनाथ ज्वेलर्स या दुकानावर बंदुकीसारख्या हत्याराचा आणि कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या चार आरोपींना राजगड पोलिसांनी अटक केली आहे. दुकानातील सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या पाच अंगठ्या जबरीने चोरून नेण्यात आल्या होत्या. या गंभीर गुन्ह्याचा तपास वेगाने करत राजगड पोलिसांनी काही तासांतच आरोपींना ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या कामगिरीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास श्रीरामनगर (बांडेवाडी), ता. हवेली येथील कोंढणपूर रोडलगत असलेल्या श्रीनाथ ज्वेलर्समध्ये ही घटना घडली. दुकानात फिर्यादी अभिजीत शांताराम कांडेसर (वय २६, सध्या रा. आंबेगाव बुद्रुक, ता. हवेली, मूळ रा. लेंगरे, ता. खानापूर, जि. सांगली) आणि कारागीर नितीन सुभाष क्षीरसागर उपस्थित होते.

यावेळी काळ्या रंगाचे कपडे घातलेले चार अनोळखी इसम दुकानात आले. त्यापैकी एका आरोपीने बॅगेतून बंदुकीसारखे दिसणारे हत्यार काढून कारागिराच्या डोक्याला लावले. इतरांनीही बंदुकीसारख्या हत्याराचा आणि कोयत्याचा धाक दाखवून दुकानातील काउंटरवर ठेवलेल्या अर्धा तोळा वजनाच्या सोन्याच्या पाच अंगठ्या, अंदाजे ३ लाख ५० हजार रुपये किमतीच्या, जबरीने चोरून नेल्या. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.

चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५) तसेच शस्त्र अधिनियमातील कलम ४ आणि २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी चार संशयित आरोपींना निष्पन्न करून अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

१. ईश्वर गोपीनाथ वाघमारे (वय ३०, रा. वांगी बुद्रुक, ता. धाराशिव, जि. धाराशिव).

२. शैलेश हरीश साबळे (वय २१, व्यवसाय चहाचे दुकान, रा. शिवाजीनगर, खेड शिवापूर, ता. हवेली, जि. पुणे).

३. तानाजी नामदेव लोंढे (वय ३९, व्यवसाय मजुरी, रा. शिवाजीनगर, खेड शिवापूर, ता. हवेली, जि. पुणे).

४. करण गोपाळ हजारे (वय २१, व्यवसाय मजुरी, रा. शिवाजीनगर, खेड शिवापूर).

या चौघांना गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी अटक करण्यात आली असून, दरोड्यातील सोन्याच्या अंगठ्या, वापरलेली हत्यारे आणि गुन्ह्यातील इतर बाबींबाबत पोलीस तपास करीत आहेत.

पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या पथकाची कामगिरी

श्रीनाथ ज्वेलर्सवरील दरोड्याची गंभीर दखल घेत राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत चार आरोपींना अटक केली. या कारवाईमुळे परिसरातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असून, दरोड्याच्या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

व्यापारी आस्थापनांमध्ये घुसून शस्त्रांचा धाक दाखवत लूटमार करण्याच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत असताना, राजगड पोलिसांनी या प्रकरणात केलेली तातडीची कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.


  • 👍

‘साहेबांच्या मर्जीतला’ तोतया पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कथित वरदहस्ताने अवैध व्यवसायांना अभय? राजगड पोलिस ठाणे पुन्हा चर्चेत; अवैध व्यवसायांवरून नागरिकांचे गंभीर सवाल काही दिवसांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्याचा कथित दरोडा प्रकरणाशी संबंध; आता अवैध व्यवसायांच्या चर्चेने खळबळ

109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

‘साहेबांच्या मर्जीतला’ तोतया पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कथित वरदहस्ताने अवैध व्यवसायांना अभय? राजगड पोलिस ठाणे पुन्हा चर्चेत; अवैध व्यवसायांवरून नागरिकांचे गंभीर सवाल काही दिवसांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्याचा कथित दरोडा प्रकरणाशी संबंध; आता अवैध व्यवसायांच्या चर्चेने खळबळ

error: Content is protected !!