आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट? मटका, जुगार, अवैध दारू विक्रीसह विविध गैरप्रकारांची चर्चा; पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष


नसरापूर : राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी अवैध धंद्यांविरोधात पोलिसांकडून कारवायांना वेग आला होता. गुटखा, हातभट्टी दारू, गांजा, मटका आदी प्रकारांवर कारवाई होत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अलीकडच्या काळात या कारवायांमध्ये काहीशी मंदी आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

 

वेळू, शिंदेवाडीपासून सारोळ्यापर्यंतच्या परिसरात मटका, जुगार, अवैध दारू विक्री, गुटखा, गांजा तसेच वेश्याव्यवसायासह विविध अवैध प्रकार सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे? संबंधित ठिकाणी पोलिसांकडून नियमित पाहणी केली जाते का? अवैध धंद्यांबाबत मिळणाऱ्या माहितीची पडताळणी केली जाते का? असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.

 

काही दिवसांपूर्वी नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली कारवायांना वेग आल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून पुढेही सातत्याने कारवाई होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, सध्या कारवायांचा वेग कमी झाल्याची चर्चा असल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

 

पोलिस प्रशासन कारवाईचा धडाका पुन्हा सुरू करणार का?

 

अवैध धंद्यांमुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारी व चर्चांची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. संबंधित परिसरात विशेष मोहीम राबवून वस्तुस्थिती तपासावी आणि गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

मटका-जुगारासह अवैध दारू विक्री आणि इतर गैरप्रकारांवर राजगड पोलीस स्टेशन पुन्हा कारवाईचा धडाका कधी सुरू करणार? नागरिकांच्या चर्चांची पोलिस प्रशासन दखल घेणार का?

 

या प्रश्नांची उत्तरे आता प्रत्यक्ष कारवाईतून मिळणार का, याकडे राजगड परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


  • 👍

‘साहेबांच्या मर्जीतला’ तोतया पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कथित वरदहस्ताने अवैध व्यवसायांना अभय? राजगड पोलिस ठाणे पुन्हा चर्चेत; अवैध व्यवसायांवरून नागरिकांचे गंभीर सवाल काही दिवसांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्याचा कथित दरोडा प्रकरणाशी संबंध; आता अवैध व्यवसायांच्या चर्चेने खळबळ

109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

‘साहेबांच्या मर्जीतला’ तोतया पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कथित वरदहस्ताने अवैध व्यवसायांना अभय? राजगड पोलिस ठाणे पुन्हा चर्चेत; अवैध व्यवसायांवरून नागरिकांचे गंभीर सवाल काही दिवसांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्याचा कथित दरोडा प्रकरणाशी संबंध; आता अवैध व्यवसायांच्या चर्चेने खळबळ

error: Content is protected !!