आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

सारोळ्यात ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ रंगला! ७० महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; विकी भैया अशोक मोरे यांच्या सहकार्यातून आकर्षक बक्षिसांचे वितरण


सारोळे : श्री शिवशंभो सेवा प्रतिष्ठान, गांधी चौक, सारोळे यांच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा, सन्मान स्त्रीशक्तीचा’ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या स्पर्धेत गावातील सुमारे ७० महिलांनी सहभाग घेतला. विविध मनोरंजक खेळ, प्रश्नोत्तरे आणि गंमतीदार उपक्रमांमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी लागणारी सर्व पारितोषिके विकी भैया अशोक मोरे यांच्या सहकार्यातून देण्यात आली.

 

महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणे आणि नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आनंदाचे क्षण निर्माण करणे, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता. महिलांनी विविध खेळांत उत्स्फूर्तपणे भाग घेतला. त्यांच्या उत्साहाला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या ऋतुजा मनीष धाडवे यांना मेकअप कपाट देण्यात आले. द्वितीय क्रमांकाच्या अंकिता बारवकर यांना कुलर, तृतीय क्रमांकाच्या तेजश्री गोगावले यांना टी-पॉय, चौथ्या क्रमांकाच्या मेघा राजपुरे यांना मिक्सर, तर पाचव्या क्रमांकाच्या सुषमा विजय धाडवे यांना चप्पल स्टँड देऊन सन्मानित करण्यात आले. विजेत्यांसह कार्यक्रमातील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे निवेदन आणि सूत्रसंचालन विशाल धाडवे (सर) यांनी अत्यंत विनोदी आणि मनोरंजक शैलीत केले. त्यांनी महिलांशी संवाद साधत विविध खेळ रंगवले. त्यांच्या मिश्कील प्रश्नांमुळे आणि उत्साही सूत्रसंचालनामुळे उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले. प्रेक्षकांनीही त्यांच्या सूत्रसंचालनाला भरभरून प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या आयोजनात श्री शिवशंभो सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण विश्वनाथ धाडवे पाटील यांच्यासह मंडळाच्या पदाधिकारी, सभासद आणि कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विकी भैया अशोक मोरे यांच्या सहकार्यामुळे महिलांसाठी आकर्षक पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

सारोळे गावात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचा ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने महिलांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. स्त्रीशक्तीचा सन्मान, मनोरंजन आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम घडविणारा हा उपक्रम सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे विशेष आकर्षण ठरला. अशा उपक्रमांमुळे महिलांना आनंदासोबतच स्वतःचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


  • 👍

‘साहेबांच्या मर्जीतला’ तोतया पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कथित वरदहस्ताने अवैध व्यवसायांना अभय? राजगड पोलिस ठाणे पुन्हा चर्चेत; अवैध व्यवसायांवरून नागरिकांचे गंभीर सवाल काही दिवसांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्याचा कथित दरोडा प्रकरणाशी संबंध; आता अवैध व्यवसायांच्या चर्चेने खळबळ

109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

‘साहेबांच्या मर्जीतला’ तोतया पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कथित वरदहस्ताने अवैध व्यवसायांना अभय? राजगड पोलिस ठाणे पुन्हा चर्चेत; अवैध व्यवसायांवरून नागरिकांचे गंभीर सवाल काही दिवसांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्याचा कथित दरोडा प्रकरणाशी संबंध; आता अवैध व्यवसायांच्या चर्चेने खळबळ

error: Content is protected !!