आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

अवैध धंद्यांवर वरदहस्त कोणाचा? अवैध व्यवसायांना ‘रान’ मोकळं कसं? शिंदेवाडी, शिवापूर, किकवी, सारोळा ते चेलाडी परिसरातील चर्चांनी गंभीर प्रश्न; राजगड पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष


राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिंदेवाडी, शिवापूर, किकवी, सारोळा ते चेलाडी परिसरात मटका, जुगार, गावठी हातभट्टी दारू, ताडी, गुटखा, गांजा यांसह विविध अवैध धंदे सुरू असल्याच्या चर्चा सध्या परिसरात रंगू लागल्या आहेत. मात्र, या चर्चांमध्ये नेमके किती तथ्य आहे, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून या बाबींची वस्तुनिष्ठ पडताळणी होणे गरजेचे आहे.

 

विशेष म्हणजे, काही ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याच्या चर्चांसोबतच राजगड पोलिस ठाण्यातील काही पोलिस कर्मचारी आणि तथाकथित मध्यस्थांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, कोणत्याही पोलिस कर्मचारी किंवा व्यक्तीवर ठोस पुराव्याशिवाय आरोप करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे या चर्चांची स्वतंत्र चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची आवश्यकता आहे.

 

जर संबंधित परिसरात मटका-जुगार, अवैध दारू किंवा इतर गैरप्रकार सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाला मिळत असेल, तर त्यावर तातडीने कारवाई का होत नाही? संबंधित ठिकाणी अचानक छापे, रात्रीची गस्त आणि विशेष तपासणी मोहीम राबवली जाते का? तसेच कारवाई झाल्यास केवळ किरकोळ व्यक्तींवर कारवाई न करता या अवैध व्यवसायामागील संपूर्ण साखळीचा शोध घेतला जातो का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

 

अवैध धंद्यांवर वरदहस्त कोणाचा?

 

हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मात्र, या प्रश्नाचे उत्तर आरोप-प्रत्यारोपातून नव्हे, तर पोलिसांच्या अधिकृत तपासातून मिळणे आवश्यक आहे.

 

राजगड पोलिस प्रशासनाने शिंदेवाडीपासून चेलाडीपर्यंतच्या परिसरात विशेष मोहीम राबवून वस्तुस्थिती तपासावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. जर अवैध धंदे सुरू असल्याचे आढळले, तर संबंधितांवर नियमानुसार कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत काही तक्रारी किंवा पुरावे आढळल्यास त्याचीही निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे.

 

चर्चा खरी की पोलिस प्रशासनापासून लपलेली वस्तुस्थिती?

 

चर्चा खरी असेल तर कारवाई कधी होणार? आणि चर्चा चुकीची असेल तर ती चुकीची असल्याचे स्पष्ट करण्यासाठी पोलिस प्रशासन पुढाकार कधी घेणार? परिसरात अवैध व्यवसायांना खरोखरच ‘रान’ मोकळे मिळाले आहे का, की पोलिसांच्या प्रभावी कारवाईने या चर्चांना पूर्णविराम मिळणार?

 

अवैध धंद्यांना खरोखर कोणाचे पाठबळ आहे का? संबंधित यंत्रणांना याची माहिती आहे का? आणि असल्यास कारवाई का होत नाही?

 

या प्रश्नांची उत्तरे आता केवळ चर्चेतून नव्हे, तर प्रत्यक्ष तपासणी, अधिकृत माहिती आणि ठोस कारवाईतून समोर येणे अपेक्षित आहे. राजगड पोलिस प्रशासन या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणार का, याकडे शिंदेवाडीपासून चेलाडीपर्यंतच्या परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


  • 👍

‘साहेबांच्या मर्जीतला’ तोतया पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कथित वरदहस्ताने अवैध व्यवसायांना अभय? राजगड पोलिस ठाणे पुन्हा चर्चेत; अवैध व्यवसायांवरून नागरिकांचे गंभीर सवाल काही दिवसांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्याचा कथित दरोडा प्रकरणाशी संबंध; आता अवैध व्यवसायांच्या चर्चेने खळबळ

109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

‘साहेबांच्या मर्जीतला’ तोतया पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कथित वरदहस्ताने अवैध व्यवसायांना अभय? राजगड पोलिस ठाणे पुन्हा चर्चेत; अवैध व्यवसायांवरून नागरिकांचे गंभीर सवाल काही दिवसांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्याचा कथित दरोडा प्रकरणाशी संबंध; आता अवैध व्यवसायांच्या चर्चेने खळबळ

error: Content is protected !!