भोर, पुणे : चेन्नई येथे पार पडलेल्या नॅशनल रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित स्केट गेम स्पर्धेत भोर तालुक्यातील भेलकेवाडी येथील श्लोक पराग भेलके याने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. या यशामुळे भोर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
देशभरातील विविध राज्यांमधील खेळाडूंनी या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत श्लोक भेलके याने आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे दर्शन घडवत २०० मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
श्लोकच्या या यशाबद्दल भोर तालुक्यात सर्व स्तरांवरून त्याचे अभिनंदन व कौतुक केले जात असून, क्रीडा क्षेत्रात त्याने आणखी मोठी भरारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Views: 3









