आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

सामाजिक समता सप्ताह उत्साहात साजरा बार्टीमार्फत पुणे जिल्ह्यात जनजागृतीचे विविध उपक्रम


पुणे : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या समतादूत प्रकल्पांतर्गत तसेच समाजकल्याण विभागाच्या वतीने ८ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान हा सप्ताह आयोजित करण्यात आला होता.

 

या सप्ताहाची सुरुवात ८ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली. सप्ताहभर पथनाट्यांच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. तसेच संत गाडगेबाबा महाराज व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 

याशिवाय महाविद्यालये, शासकीय निवासी शाळा व वसतिगृहांमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धा, महिला मेळावे, स्वच्छता अभियान तसेच विविध प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात आले. बिबवेवाडी परिसरातील अप्पर इंदिरानगर येथे पथनाट्याद्वारे योजनांची प्रभावी जनजागृती करण्यात आली.

 

समाजकल्याण आयुक्त तथा महासंचालक श्रीमती दीपा मुधोळ, निबंधक डॉ. सुचिता शिंदे, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड तसेच सहायक आयुक्त श्री. विशाल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविण्यात आले, अशी माहिती बार्टीचे प्रकल्प अधिकारी शितल बंडगर यांनी दिली.

 

दरम्यान, १४ एप्रिल रोजी बार्टी मुख्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत समता रॅली काढून अभिवादन करण्यात आले व सप्ताहाची सांगता करण्यात आली.

सदर कार्यक्रमांचे नियोजन प्रकल्प अधिकारी शितल बंडगर यांच्या नेतृत्वाखाली समतादूत किर्ती आखाडे, उषा कांबळे, तेजस्विनी कांबळे, प्रशांत कुलकर्णी, संगीता शहाडे, अनिता दहीकांबळे, शशिकांत जाधव, सचिन कांबळे व भारती अवघडे यांनी यशस्वीपणे पार पाडले.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!