आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

केळवडे येथे कॉलेज परिसरात तरुणावर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला आठ अनोळखी युवकांविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


केळवडे (ता. भोर, जि. पुणे) परिसरात दिवसाढवळ्या तरुणावर निर्घृण हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे. नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट कॉलेजच्या गेटजवळून जात असताना चार वाहनांवरून आलेल्या आठ अनोळखी युवकांनी एका तरुणास अडवून बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी श्री. प्रणव सचिन शेलार (वय २२, व्यवसाय – शिक्षण, रा. काकडेमळा, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी दोनच्या सुमारास, केळवडे गावच्या हद्दीत नवसह्याद्री कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडत असताना उताराजवळ चार वाहनांवरून आलेल्या आठ अनोळखी युवकांनी त्यांना अडवले. “तु कुठला आहेस, काय बोललास?” असे म्हणत कोणतेही कारण नसताना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली.

त्यानंतर आरोपींनी हाताने, लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. याचवेळी आरोपींपैकी एका युवकाने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर, हातापायांवर व पाठीवर प्रहार करत गंभीर दुखापत केली. सर्व आरोपींनी सामाईक इराद्याने हा हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके कार्यरत आहेत.

कॉलेज परिसरात घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी होत आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!