आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

गुंजवणे येथे रस्त्याकडेला अज्ञात इसमाचा मृतदेह; परिसरात खळबळ


विंझर प्रतिनिधी राजेंद्र रणखांबे 

राजगड तालुक्यातील गुंजवणे येथील लिम्हणवाडी रोडच्या कडेला एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवार (दि. ७) रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक ग्रामस्थ दिलीप कोथमिरे व विकास लिम्हण यांना लिम्हणवाडी रोडच्या कडेला पिवळ्या रंगाचा टी-शर्ट व निळसर रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केलेला एक अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसून आला. या घटनेची गंभीरता ओळखून त्यांनी तत्काळ गावचे पोलीस पाटील बाळू चंदर रसाळ यांना माहिती दिली.

पोलीस पाटील यांनी लगेचच वेल्हे पोलीस स्टेशनला कळवून बेशुद्ध अवस्थेतील इसमाला स्वतःच्या वाहनातून ग्रामीण रुग्णालय, वेल्हे येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती संबंधित इसमाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

मृत इसमाचे वय अंदाजे ३६ वर्षे असून त्याचे नाव व पत्ता अद्याप अज्ञात आहे. स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर इसम हा परिसरात गवंडी काम करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, डॉक्टरांनी शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करून व्हिसेरा राखून ठेवला आहे. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचा अधिक तपास वेल्हे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. एम. काळे व तपासी अंमलदार व्ही. ई. जाधव करीत आहेत. मृत इसमाची ओळख पटविण्यासाठी परिसरातील गावांमध्ये चौकशी सुरू असून, संबंधितांनी माहिती असल्यास वेल्हे पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!