आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

शिवजयंतीनिमित्त वेल्ह्यात विविध सांस्कृतिक व ऐतिहासिक कार्यक्रमांचा उत्साह विद्यार्थ्यांच्या सहभागातून शिवचरित्राचा जागर  शिवज्योत मिरवणुकीने वातावरण शिवमय


राजगड, प्रतिनिधी – राजेंद्र रणखांबे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वेल्हे तालुक्यात विविध ठिकाणी उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समिती समोर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर, सदस्या सीता खुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेल्हेचे मुख्याध्यापक भरत शेंडकर, किरण कांबळे, ड्रीमलँड इंग्लिश स्कूल मालवलीच्या मुख्याध्यापिका तृप्ती शिळीमकर, माजी सरपंच संतोष मोरे, नथू गायकवाड, अमोल गायकवाड, विनायक लिम्हण, सुनील राजीवडे, राणी दिघे, हर्षदा देशपांडे, चंद्रकांत चव्हाण, रविंद्र करंजकर आदींसह कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान वेल्हे येथील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर व शिवचरित्रावर आधारित गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ड्रीमलँड इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थी ज्ञानेश्वर भोसले यांनी सादर केलेल्या जोशपूर्ण शिवकालीन पोवाड्याने वातावरण दणाणून गेले.

 

ड्रीमलँड इंग्लिश स्कूलमध्येही शिवजयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विश्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष दसवडकर, संचालिका सुप्रिया दसवडकर व प्राचार्या तृप्ती शिळीमकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर वेल्हे ते मालवली दरम्यान विद्यार्थ्यांनी शिवज्योत आणत भव्य मिरवणूक काढली.

शिवज्योतीचे स्वागत करताना विद्यार्थ्यांनी शिवचरित्रातील महत्त्वपूर्ण घटनांचे सादरीकरण केले. मोगलांकडून झालेला छळ, अफजलखान वध, रायरेश्वरावर घेतलेली स्वराज्याची शपथ यांसारख्या प्रसंगांवर आधारित नृत्य व गीते सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपली मनोगते व्यक्त करत स्वराज्याच्या विचारांची उजळणी केली.

या कार्यक्रमास अध्यक्ष संतोष दसवडकर, संचालिका सुप्रिया दसवडकर, प्राचार्या तृप्ती शिळीमकर, स्वाती निगडे, राणी दिघे, हर्षदा देशपांडे, रेश्मा कांबळे, मिनल रणखांबे, श्रेया पडवळ, ऋतुजा दसवडकर, नम्रता भगत, सानिका शिंदे, शुभम सरपाले, प्रणिता कोतवाड, रिचा जामदार, अभिलाषा गायकवाड आदींसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमुळे वेल्हे परिसरात शिवभक्ती, इतिहासप्रेम आणि राष्ट्राभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!