आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भट्टी खिंड मार्गावर खडीने भरलेला डंपर उलटला चालक किरकोळ जखमी; वेल्हे–केळद मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद


पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात भट्टी खिंड मार्गावर खडीने भरलेला डंपर उलटून अपघात झाल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून चालक किरकोळ जखमी झाला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, भट्टी गावाकडून पासली गावाच्या दिशेने जाणाऱ्या कच्च्या व चढाच्या रस्त्यावरून डंपर जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. चढावर गाडीचा वेग कमी झाल्यानंतर डंपर अचानक मागे सरकू लागला आणि नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरच उलटला. प्रसंगावधान राखत चालकाने वेळीच डंपरमधून उडी मारल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

 

अपघातानंतर खडीने भरलेला डंपर रस्त्याच्या मधोमध उलटल्याने वेल्हे ते केळद मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच प्रशासन व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यंत्रसामग्रीच्या साहाय्याने डंपर बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

 

या अपघातात डंपरचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने अन्य वाहन किंवा प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. भट्टी खिंड परिसरातील रस्ते अरुंद व चढ-उताराचे असल्याने अवजड वाहनांनी सावधगिरी बाळगण्याची गरज स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!