आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

माळेगावातील ७५ वर्षीय आजोबांचा प्रेरणादायी संदेश : ‘आरोग्यासाठी व्यायाम करा, प्रदूषणमुक्त जीवन जगा’


आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्य जपणे अत्यंत आवश्यक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर माळेगाव येथील दत्त मंदिराचे पुजारी दत्तात्रेय माणिक कासार यांनी आपल्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त समाजाला एक प्रेरणादायी संदेश दिला आहे.

 

वयाच्या ७५ व्या वर्षीही उत्साह आणि सकारात्मकतेने भरलेले कासार आजोबा नियमित सायकल चालवून व्यायामाचे महत्त्व आणि प्रदूषणमुक्त जीवनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत. वाढत्या वयातही त्यांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

 

दत्त मंदिरात पुजारी म्हणून सेवा बजावत असताना त्यांनी नेहमीच समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केक कापणे किंवा मोठे कार्यक्रम न करता समाजाला आरोग्य आणि पर्यावरणाबाबत जागरूक करण्याचा मार्ग निवडला.

 

कासार आजोबा म्हणाले की, “आजच्या काळात मोबाईल आणि यांत्रिक जीवनामुळे लोकांचे शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. त्यामुळे अनेक आजार वाढताना दिसत आहेत. दररोज व्यायाम, चालणे किंवा सायकल चालवणे यामुळे शरीर निरोगी राहते आणि मन प्रसन्न राहते.”

 

त्याचबरोबर त्यांनी सायकलचा वापर वाढवून प्रदूषण कमी करण्याचेही आवाहन केले. वाहनांचा अतिवापर टाळून शक्य तिथे सायकल किंवा पायी चालण्याची सवय लावल्यास पर्यावरणाचे संरक्षण होईल, असे त्यांनी सांगितले.

 

दरम्यान, त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त नसरापूर गावातील व्यापारी सुयोग कस्तुरे, अमोल काजळे, संजय नकाते, निलेश जंगम तसेच केळवडे गावचे भरत सोनवणे यांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. समाजासाठी दिलेला आरोग्य आणि पर्यावरण जपण्याचा संदेश प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

 

वयाच्या ७५ व्या वर्षीही त्यांनी दाखवलेली जिद्द आणि सकारात्मक विचार पाहून परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल कौतुकाची भावना व्यक्त होत आहे. माळेगावातील या ज्येष्ठ व्यक्तीने आपल्या कृतीतून दिलेला संदेश – “निसर्ग जपा, शरीर जपा आणि निरोगी आयुष्य जगा” – हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


  • 👍

‘साहेबांच्या मर्जीतला’ तोतया पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कथित वरदहस्ताने अवैध व्यवसायांना अभय? राजगड पोलिस ठाणे पुन्हा चर्चेत; अवैध व्यवसायांवरून नागरिकांचे गंभीर सवाल काही दिवसांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्याचा कथित दरोडा प्रकरणाशी संबंध; आता अवैध व्यवसायांच्या चर्चेने खळबळ

109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

‘साहेबांच्या मर्जीतला’ तोतया पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कथित वरदहस्ताने अवैध व्यवसायांना अभय? राजगड पोलिस ठाणे पुन्हा चर्चेत; अवैध व्यवसायांवरून नागरिकांचे गंभीर सवाल काही दिवसांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्याचा कथित दरोडा प्रकरणाशी संबंध; आता अवैध व्यवसायांच्या चर्चेने खळबळ

error: Content is protected !!