आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

राजगड तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेसाठी वेल्हे पोलिसांचे विशेष आवाहन  संशयास्पद हालचाली दिसताच तात्काळ पोलिसांना कळवा; नागरिक-पोलीस सहकार्यावर भर


वेल्हे (ता. राजगड) : तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालणे तसेच अनुचित प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी वेल्हे पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनी सर्व नागरिक, व्यावसायिक तसेच भाडेमालकांनी सतर्क राहून पोलिसांना सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी आपले घर, फ्लॅट, सदनिका अथवा रूम भाड्याने देताना संबंधित भाडेकरूसोबत विधिवत भाडेकरार करणे आवश्यक असून आधारकार्ड, पॅनकार्ड यांसारख्या ओळखपत्रांच्या प्रती जतन करून ठेवाव्यात. तसेच भाडेकराराची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यास देणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
गावांमध्ये वास्तव्यास असलेले परप्रांतीय कामगार तसेच कंपनी, हॉटेल, दुकान, लॉज, रिसॉर्ट, बंगलो, वीटभट्टी, पोल्ट्रीफार्म, राईस मिल व उसतोड आदी व्यवसायांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती, नातेवाईकांचे संपर्क क्रमांक आणि ओळखपत्रांच्या प्रती ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासूनच त्यांना कामावर ठेवावे, असेही पोलिसांनी नमूद केले.
गावात येणारे फिरते विक्रेते, एजंट व परप्रांतीय व्यावसायिक यांची ओळख निश्चित करून आवश्यक असल्यास त्यांच्या मोबाईलवर छायाचित्र घ्यावे. बँका, पतसंस्था, सराफ कट्टा, मंदिरे किंवा मौल्यवान वस्तू असलेल्या घरांच्या परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ ०२१३०-२२१२३३ या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, वरील सूचनांचे पालन न केल्यास भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये संबंधितांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वेल्हे पोलिसांकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन शेवते यांनी केले.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!