आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

राजगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या पर्यटकाचा अचानक मृत्यू चक्कर येऊन कोसळल्यानंतर रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित


राजगड प्रतिनिधी : दिनेश गायकवाड

राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. 14 फेब्रुवारी 2026) दुपारी घडली. संदीप बाळकृष्ण पवार (वय 52, रा. मु.पो. आरफळ, ता. सातारा, जि. सातारा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

 

वेल्हे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमेश हरिभाऊ हिवरकर (वय 50, रा. साईनगर, एमआयडीसी बारामती) यांनी याबाबत माहिती दिली. बारामती येथील एका कंपनीतील सहकारी मित्रांचा गट सुट्टीच्या निमित्ताने खासगी वाहनाने राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता.

 

सकाळी सुमारे 10.30 वाजता सर्वजण बालेकिल्ल्यावर पोहोचले. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास ते खाली उतरण्यास सुरुवात केली. यावेळी पुढे चालत असलेले संदीप पवार यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाले.

 

सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने स्थानिकांच्या मदतीने त्यांना वेल्हे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांनी दुपारी 15:02 वाजता मृत्यू झाल्याचे नमूद केले.

 

या घटनेची नोंद वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. पोलीस हवालदार मोघे व पोलीस हवालदार शिंदे यांच्या मार्फत तपास सुरू असून सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

 

दरम्यान, ऐतिहासिक किल्ल्यांवर ट्रेकिंग करताना पर्यटकांनी आरोग्याची काळजी घेणे व आवश्यक ती खबरदारी बाळगणे गरजेचे असल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!