आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

खानापूरच्या माजी विद्यार्थी संघातर्फे स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली महात्मा गांधी विद्यालयात शोकसभा; माजी विद्यार्थी, शिक्षकांची मोठी उपस्थिती


खानापूर : येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघातर्फे महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आयोजित शोकसभेला विद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या कार्याला उजाळा दिला.

 

शोकसभेदरम्यान माजी विद्यार्थ्यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा भावनिक शब्दांत उल्लेख केला. त्यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राने कर्तृत्ववान, विकासाभिमुख व करारी नेतृत्व गमावले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. महात्मा गांधी विद्यालयाची नूतन इमारत त्यांच्या संकल्पनेतून साकार झाली असून शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले योगदान मोलाचे असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

 

स्व. अजितदादा पवार हे स्पष्टवक्तेपणा, रोखठोक भाषाशैली आणि ठाम निर्णयक्षमतेसाठी ओळखले जात होते. त्यांच्या वैचारिक मंथनामुळे व विकासदृष्टीमुळे राज्याच्या प्रगतीला दिशा मिळाली होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या भावी विकासाला मोठी हानी झाल्याची भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

 

या शोकसभेस प्रवीण शिंदे (संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), नवनाथ पारगे (माजी जि.प. सदस्य), अमोल आबासाहेब जावळकर (अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ), प्रवीण पारगे (उपाध्यक्ष), नंदकुमार जावळकर (कोषाध्यक्ष), शिवराम साबळे (मुख्याध्यापक व सचिव), सल्लागार सदस्य लक्ष्मण माताळे, शशिकांत किवळे, रघुनाथ यादव, सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत जाधव, माजी उपसरपंच सुधाकर गायकवाड, बाबासाहेब शिंदे, शांताराम जावळकर, दत्तात्रय जावळकर, विजय जावळकर, प्रवीण पारगे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

तसेच ज्योत्स्ना गुरव, डॉ. कीर्ती जाधव, भिमराव आदलिंग, विपुल व्हावळ, सुजाता भोसले, नूतन ओतुरकर, मीरा कदम, शितल सुकाळे, रमेश कोळी, मानसी मोरे, भिमाजी हिंगे, रायबा कुंभार, प्रकाश रोखडे, संतोष पंडित, रुपाली जावळकर, लोणकर सर, मोरे, मोकाशी मॅडम आदी शिक्षक-शिक्षकेत्तर सहकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे निवेदन भगवान मदने यांनी केले.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!