आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

मानकरवाडी (बाजारवाडी) ग्रामस्थांनी दिले भेकराला जीवनदान


भोर | प्रतिनिधी : तबरेज खान

सद्यस्थितीत जंगलांची विरळता वाढत चालल्याने जंगलातील वन्यप्राणी अन्न व सुरक्षिततेच्या शोधात मानवी वस्तीच्या दिशेने येत असल्याचे प्रकार वाढले आहेत. अशाच एका घटनेत भोर तालुक्यातील मानकरवाडी (बाजारवाडी) येथे भेकर जातीच्या पिल्लूवजा प्राण्याला ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे जीवनदान मिळाले.

 

भोर तालुक्यातील मानकरवाडी गावात अचानक भेकर जातीचे पिल्लूवजा प्राणी मानवी वस्तीमध्ये घुसले. गावातील कुत्र्यांनी त्याचा पाठलाग सुरू केल्याने प्राणी घाबरून गणेश चव्हाण यांच्या शेतातील आवारात आश्रयासाठी शिरला. ही बाब लक्षात येताच प्राणीमित्र गणेश चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न करता वनविभागाला भ्रमणध्वनीवरून माहिती दिली.

 

माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक शितल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल शिवाजी राऊत, भोर वनरक्षक के. एम. हिमोणे, हंगामी वनमजूर गणेश बोडरे व अविनाश चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून भेकराला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. त्यानंतर वनपाल सुग्रीव मुंढे यांच्या आदेशानुसार सदर भेकराला घेराविचित्रगड परिसरातील दाट जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आले.

 

या संपूर्ण कार्यात गावातील ग्रामस्थ संपत मानकर, आकाश मानकर, अजित मानकर, राजेंद्र सापते, किसन मानकर, रोहित चोरगे आदींनी मोलाचे सहकार्य केले. ग्रामस्थांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे आणि वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे एका निरपराध वन्यप्राण्याचे प्राण वाचले.

 

या आदर्शवत कामगिरीमुळे मानकरवाडी (बाजारवाडी) परिसरात ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत असून, वन्यजीव संरक्षणाबाबत समाजात सकारात्मक संदेश गेला आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!