आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

धनशक्तीला नकार; सुज्ञ मतदारांचा जागर — नसरापूर-वेळू गटातील निवडणूक निर्णायक वळणावर


जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून आता निवडणुकीचे अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. या अंतिम टप्प्यात सर्वत्र धनशक्तीचा पाऊस पडत असल्याच्या चर्चा जनतेतून उघडपणे होत आहेत. मात्र, याच धनशक्तीच्या विरोधात आता मतदारराजा ठामपणे उभा राहत असल्याचे स्पष्ट चित्र नसरापूर-वेळू गटात दिसून येत आहे.

निवडणुकीच्या अखेरच्या क्षणी उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला जात असल्याचे बोलले जात असले, तरी धनशक्तीच्या जोरावर निवडणूक जिंकता येणार नाही, असा ठाम सूर आता जनतेतून उमटत आहे. यावेळी मतदार अधिक सुज्ञ, जागरूक व विचारपूर्वक मतदान करण्याच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे.

कुठल्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता, विकास, प्रामाणिकपणा व लोकांशी असलेली नाळ पाहूनच मतदान करण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे. “आता पैसा नाही, तर माणूस आणि काम महत्त्वाचे” अशी भावना मतदारांमध्ये बळावत चालली आहे.

धनशक्तीला आळा घालण्यासाठी मतदार स्वतःच हुशार झाल्याने केवळ पैशाच्या बळावर मिळणारे मतदान नाकारले जात असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे धनशक्तीवर आधारित राजकारणाला या निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नसरापूर-वेळू गटामध्ये सध्या धनशक्तीचे वारे वाहत असले, तरी त्यावर मतदान होणार नाही, अशी ठाम भूमिका मतदारांनी घेतली आहे. यामुळे ही निवडणूक केवळ उमेदवारांची नव्हे, तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निर्णायक लढत ठरत असल्याचे चित्र आहे.

एकंदरीत, या निवडणुकीत मतदारराजाच खरा राजा ठरणार असून, धनशक्तीला नकार देत योग्य व पात्र उमेदवाराला संधी देण्याचा निर्धार जनतेने केला असल्याचे वातावरण नसरापूर-वेळू गटात स्पष्टपणे जाणवत आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!