आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

कंपनीच्या गेटवर कोयत्याने हल्ला; तोडफोड करत दहशत


भोर तालुक्यातील कासुर्डी खेबा येथे कंपनीच्या गेटवर कोयत्याने हल्ला करून तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात एका मुख्य आरोपीसह ८ ते १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अदित्य अभिमन्यु शेजवळ (वय २२, रा. सांगवी बु., ता. भोर) यांनी फिर्याद दिली आहे. दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी पहाटे १:०० ते १:३० वाजण्याच्या दरम्यान सीएम इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या गेटवर ही घटना घडली.

 

फिर्यादी हे कंपनीच्या गेटवर असताना आरोपी रोहीत उर्फ दादू लिमण (रा. विंझर, ता. राजगड-वेल्हा) व त्याच्या सोबत असलेल्या ८ ते १० इसमांनी जुन्या वादाच्या कारणावरून संगनमताने हल्ला केला. यावेळी रोहीत लिमण याने कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या करंगळीवर वार करून दुखापत केली.

 

तसेच इतर आरोपींनी फिर्यादीसोबत काम करणाऱ्या अथर्व याचा शोध घेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी कंपनीच्या काचा फोडून तसेच सिक्युरिटी केबिन व सीसीटीव्हीचे नुकसान करून दहशत माजवली.

 

या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.


  • 👍
106
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!