आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

कारचा पाठलाग करून कुटुंबावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा


हवेली तालुक्यातील बांडेवाडी परिसरात जुन्या व्यवहाराच्या वादातून कारचा पाठलाग करून कुटुंबावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुनाथ आजिनाथ सोनटक्के (वय ५७, व्यवसाय शिक्षक, रा. वडगाव शेरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ८:४५ वाजण्याच्या सुमारास बांडेवाडी बसस्टॉप व कोढणपुर फाटा परिसरात ही घटना घडली.

 

फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह कारने जात असताना आरोपी अर्जुन विठ्ठल खंदारे, दत्तात्रय भानुदास कापरे (दोघे रा. बांडेवाडी, ता. हवेली) व त्यांच्या सोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी दोन मोटारसायकलीवरून कारचा पाठलाग केला. आरोपींनी कार आडवी लावून वाहन थांबवले व शिवीगाळ करत दमदाटी केली. यावेळी कारचेही नुकसान करण्यात आले.

 

त्यानंतर फिर्यादी पुढे निघून जात असताना पुन्हा आरोपींनी पाठलाग करून कार अडवली. यावेळी अर्जुन खंदारे याने काठीने मारहाण करून फिर्यादीस दुखापत केली. तसेच सर्व आरोपींनी मिळून फिर्यादी, त्यांचा मुलगा प्रतीक, मुलगी तनिष्का व पत्नी सविता यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेत फिर्यादींच्या मुलाच्या हाताला दुखापत झाली आहे.

 

या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.


  • 👍
106
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!