आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

जनसेवा फाउंडेशनतर्फे ५० गावांमध्ये मोफत आरोग्य सेवा अनाथ व निराधार वृद्धांना मिळाला हक्काचा आधार


विंझर वार्ताहर : महेश सणस

“आम्ही या अनाथ आणि निराधार वृद्धांचे आई-वडील म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असा भावनिक विश्वास जनसेवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शहा आणि सेक्रेटरी सौ. मिना शहा यांनी व्यक्त केला. जनसेवा फाउंडेशनच्या वतीने अनाथ वृद्धांना आधार देण्यासाठी तसेच मोफत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांतर्गत नुकतेच मदतीचे वाटप करण्यात आले.

 

ग्रामीण भागात आरोग्याचा जागर

 

जनसेवा फाउंडेशनचे कार्य केवळ शहरापुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातही प्रभावीपणे विस्तारले आहे. सध्या सुमारे ५० गावांमध्ये फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा दिली जात आहे. या उपक्रमांतर्गत –

 

अनाथ व निराधार वृद्धांना सुरक्षित निवारा व आधार,

 

गरजू रुग्णांवर मोफत डोळ्यांच्या शस्त्रक्रिया,

 

गोरगरीब रुग्णांना मोफत औषधोपचार व वैद्यकीय सल्ला,

 

विविध आरोग्यविषयक तपासणी व उपचार शिबिरांचे विनामूल्य आयोजन

असे उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत.

 

 

आधार कार्ड कॅम्पचे आयोजन

 

वृद्धांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने आंबी गावचे माजी सरपंच माणिक अण्णा निवंगुणे यांच्या पुढाकाराने विशेष आधार कार्ड कॅम्प आयोजित करण्यात आला. यावेळी सौ. मिना शहा यांच्या हस्ते वृद्धांना आरोग्यविषयक साहित्याचे वाटप करण्यात आले.

 

मान्यवरांची उपस्थिती

 

या सामाजिक उपक्रमास समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावून फाउंडेशनच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. यामध्ये डॉ. शरद कदम, सोनाली सुराणा, अमोल मोरे, कल्याणी पुदागे, गौरी साने व सुशांत तेलावडे यांचा समावेश होता. उपस्थित मान्यवरांनी वृद्धांशी संवाद साधत त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

 

जनसेवा फाउंडेशनच्या या अखंड सेवाकार्यामुळे शेकडो निराधार वृद्धांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला असून, त्यांच्या आरोग्य व निवाऱ्याच्या प्रश्नांना दिलासा मिळत आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!