आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणारा ‘स्टुडंट ऑफ द इयर’ उपक्रम संपन्न हजार विद्यार्थ्यांचा सहभाग; ४२ गुणवंतांचा सन्मान, २०१४ पासून सुरू प्रेरणादायी परंपरा


युवाशक्ती प्रतिष्ठान सोशल फाऊंडेशन यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड व स्टुडंट ऑफ द स्कूल अवॉर्ड या प्रेरणादायी उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २०१४ पासून सातत्याने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाने यंदाही विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास आणि स्पर्धात्मकता निर्माण केली.

यावर्षीच्या स्पर्धेत तब्बल एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एकूण ४२ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना स्टुडंट ऑफ द इयर व स्टुडंट ऑफ द स्कूल पुरस्कारांनी गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रतिष्ठानतर्फे शालेय साहित्य (पाऊच) भेट देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साळवडे गावचे ग्रामसेवक अभय निकम तसेच प्रफुल्ल द्रविड उपस्थित होते. प्रफुल्ल द्रविड यांनी विद्यार्थ्यांना ‘वेदिक गणित’ विषयावर मार्गदर्शन करत अभ्यासातील सोप्या पद्धती स्पष्ट केल्या, तर अभय निकम यांनी प्लास्टिक पुनर्वापराचे महत्त्व सांगत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

युवाशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित मरळ यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याचा आढावा घेत भविष्यात स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अधिक व्यापक व नियोजनबद्ध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनविणे हेच संस्थेचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी प्रतिष्ठानचे सारंग फणसे, चैतन्य इंगुळकर, रोहित पाटील, वैभव कोंडे तसेच सामाजिक कार्यकर्ते योगेश बागमार, सुरेश माळवे, सौ. विद्या पवार आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, गुणवत्तापूर्ण स्पर्धा आणि शैक्षणिक प्रगतीची नवी उमेद निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!