आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

कामथडी-भोंगवली गटातून दमदार विजय विक्रम खुटवड यांची पुणे जिल्हा परिषद सदस्यपदी निवड; भोर तालुक्यात आनंदाचे वातावरण


भोर (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भोर-राजगड-मुळशी परिसरातील युवा नेते विक्रम खुटवड यांनी कामथडी-भोंगवली गटातून विजय मिळवत पुणे जिल्हा परिषद सदस्यपदी निवड मिळवली आहे. त्यांच्या विजयामुळे संपूर्ण भोर तालुक्यात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

 

विक्रम खुटवड हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक कामांमध्ये सक्रिय असून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण तसेच युवकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. स्थानिक पातळीवरील जनसंपर्क, सर्वसामान्यांशी असलेला जवळचा संवाद आणि विकासाभिमुख भूमिका यामुळे मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विजयी केले असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

निवडीनंतर विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामपंचायत उंबरेचे सरपंच तथा भोर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश सुरेश खुटवड यांनीही त्यांचे अभिनंदन करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी भावना व्यक्त करताना गणेश खुटवड म्हणाले, “विक्रम खुटवड यांच्या रूपाने तब्बल ४४ वर्षांनंतर भोर तालुक्याला पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळावे, अशी मनापासून सदिच्छा आहे.”

 

दरम्यान, जिल्हा परिषदेमार्फत मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती देणे, ग्रामीण भागातील सुविधा मजबूत करणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हे आपले ध्येय राहील, अशी भावना विक्रम खुटवड यांनी व्यक्त केली.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!