आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भाजप पुणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्षपदी शुभम बेलदरे यांची निवड


राजगड : राजगड तालुक्यातील वेल्हे येथील युवा कार्यकर्ते शुभम बेलदरे यांची भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे राजगड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजप पुणे जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी नुकतेच बेलदरे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच युवकांना राजकीय आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी करून घेण्यासाठी बेलदरे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शुभम बेलदरे हे गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या विविध संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रियपणे कार्यरत असून युवकांशी सातत्याने संपर्क ठेवत सामाजिक उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर जिल्हा स्तरावरील महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

नियुक्तीनंतर बोलताना बेलदरे यांनी सांगितले की, माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात युवकांचे मजबूत संघटन उभारण्यावर भर दिला जाणार आहे. युवकांना रोजगार, कौशल्य विकास, सामाजिक जनजागृती आणि विविध विधायक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येतील. पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!