आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

पुण्यनगरी ‘शिवमय’ : सरदारांच्या वंशजांकडून शिवरायांना मानवंदना


प्रतिनिधी महेश सणस 

राजगड ता. २०: पुण्यात शिवजयंतीनिमित्त आयोजित भव्य ‘स्वराज्यरथ सोहळ्याने’ संपूर्ण शहर शिवमय झाले होते. एकापेक्षा एक कल्पक पद्धतीने सजलेले ९६ स्वराज्यरथ, ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

 

मिरवणुकीची वैशिष्ट्ये:

भव्य सोहळा: शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे आयोजित या मिरवणुकीचे यंदा १४ वे वर्ष होते.

 

मान्यवरांची उपस्थिती: केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजूषा नागपुरे, आमदार हेमंत रासने आणि पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

वंशजांचा सहभाग: वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे, येसाजी कंक ,पिलाजीराव सणस यांसारख्या ऐतिहासिक घराण्यांच्या वंशजांनी या सोहळ्यात सक्रिय सहभाग नोंदवला.

 

पिलाजीराव सणस यांचे वंशज यांनी (रथ क्र ९) यांनी रायगडावरील शिल्प -शरभ हा एक पौराणिक प्राणी आहे, रायगडावरील शिल्पात हा शरभ आपल्या पंजाखाली हत्तींना दाबताना दाखवला आहे. येथे हत्ती हे त्या काळातील महासत्तांचे (आदिलशाही, मोगल, कुतुबशाही तसेच पोर्तुगीज, इंग्रज व डच या परकीय शक्तींचे) प्रतीक आहेत.

“सिंहापेक्षाही शक्तिशाली” असलेला शरभ म्हणजे खुद्द छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी या सर्व बलाढ्य सत्तांना नमवून ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले, हा संदेश हे शिल्प जगाला देते.

 

‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!