आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

उशिरा मिळालेल्या माहितीवर तात्काळ धाव — हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाची तत्पर कारवाई रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी; मृतदेह पोलिसांच्या ताब्यात, पुढील तपास सुरू


राजगड : हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाने केलेल्या बचाव मोहिमेत एका इसमाचा मृतदेह बाहेर काढून पुढील कारवाईसाठी पोलिस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ शंकर धोत्रे (वय ५३, रा. श्रीरामपूर, जि. नगर) यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती उशिरा मिळाल्यानंतरही हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. काही वेळातच ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.

रेस्क्यू नंतर मृतदेह पुढील तपास व पंचनामा प्रक्रियेसाठी राजगड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये हवेली आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष तानाजी भोसले तसेच सदस्य गणेश सपकाळ, संदीप साळसकर, संजय चोरगे व नाना अवसरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावत सर्व कामे पार पाडली. तसेच राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गव्हाणे व पोलीस पवार हेही पथकासोबत उपस्थित होते.

घटनेची सविस्तर माहिती पोलिसांकडे नोंदविण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!