Varandha Ghat येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डी.डी.वरील हिडोशी ते वरंधा (कि.मी. ७०/९०० ते ९२/००३) दरम्यान सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरण कामामुळे घाटरस्ता पूर्णपणे बंद करण्याचा प्रस्ताव होता. मात्र स्थानिक नागरिकांच्या सोयीचा विचार करून जिल्हाधिकारी Jitendra Dudi यांनी रस्ता पूर्ण बंद न करता पर्यायी मार्ग उपलब्ध ठेवूनच काम करण्याचे आदेश दिले आहेत.
दि. २५ मार्च २०२६ रोजी जारी आदेशानुसार, २५ मार्च ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत काम सुरू राहणार असून वाहतूक पूर्णतः बंद केली जाणार नाही.
महत्त्वाचे मुद्दे :
घाट रस्ता अरुंद, वळणावळणाचा व दरडप्रवण असल्याने धोका
एका बाजूला देवघर धरणाचे पाणी, दुसऱ्या बाजूला डोंगर
पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांना अडचण
आपत्कालीन सेवा (रुग्णवाहिका, अग्निशमन) सुरू ठेवण्याचे निर्देश
स्थानिक नागरिक, विद्यार्थी, नोकरदार यांना ये-जा सुरू राहणार
कामाबाबत माहिती :
एकूण सुमारे २१.१० कि.मी. काम
त्यापैकी ३.५० कि.मी. काँक्रीटीकरण पूर्ण
उर्वरित भागात काम सुरू
पर्यायी मार्ग :
पुण्याकडे: माणगाव – निजामपूर – ताम्हिणी – मुळशी – पिरंगुट – पुणे
कोल्हापूरकडे:
राजेवाडी – पोलादपूर – महाबळेश्वर – वाई – सातारा – कराड
किंवा राजेवाडी – पोलादपूर – खेड – चिपळूण – पाटण – कराड
प्रशासनाच्या सूचना :
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात
मार्गदर्शक फलक/बॅनर लावावेत
नागरिकांना पूर्वसूचना देऊन जनजागृती करावी
दरम्यान, विकासकाम आणि नागरिकांची सोय यांचा समतोल राखत हा निर्णय घेण्यात आल्याने स्थानिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.










