आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

मार्गासनीत अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ; भक्तिमय वातावरणात गाव दंग सलग ४६ वर्षांची परंपरा कायम; ज्ञानेश्वरी पारायणाने आध्यात्मिक सोहळ्याची सुरुवात


राजगड तालुक्यातील मार्गासनी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास भक्तिमय वातावरणात उत्साहात सुरुवात झाली आहे. तब्बल ४६ वर्षांची अखंड परंपरा जपत हा सप्ताह सुरू असून परिसरात धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे.

 

ह.भ.प. मारुती महाराज वालगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी विधीपूर्वक वीणा पूजन व कलशपूजन हनुमंत महाराज वालगुडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर ज्ञानेश्वरी पारायणास सुरुवात होताच गावात भक्तिरसाचा ओघ वाहू लागला.

 

या सप्ताहात दररोज विविध कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये दीपक महाराज मोरे, तुषार महाराज दळवी, सुनील महाराज राजीवडे, पांडुरंग महाराज गव्हाणे, नवनाथ महाराज नवस्कर, कांता महाराज, कांता महाराज चोरघे, मारुती महाराज वालगुडे, हर्षद महाराज दसवडकर आणि मयूर महाराज कोंडे यांचा समावेश आहे. त्यांच्या कीर्तनांमधून समाजप्रबोधनासह भक्तीचा संदेश दिला जाणार आहे.

 

तसेच तुकाराम महाराज वालगुडे, लक्ष्मण महाराज उफाळे, एकनाथ महाराज उफाळे व गोरक्ष महाराज वालगुडे हे मान्यवर मार्गदर्शन करणार असून भाविकांना अध्यात्मिक विचारांची दिशा मिळणार आहे.

 

या सप्ताहासाठी नसरापूर, वांगणी, वाजेघर, पानशेत, पासली, वेल्हे, सोंडे, वेळु, शिरवळ आदी परिसरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. गावकऱ्यांनीही या सोहळ्याचे उत्तम नियोजन केले असून भक्तांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

 

४६ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या परंपरेमुळे मार्गासनी गावाला धार्मिक ओळख मिळाली असून, समाजात एकोपा आणि श्रद्धेची भावना अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!