दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) पुणे जिल्हा पूर्व अंतर्गत राजगड-वेल्हे तालुका महिला विभागाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. विंझर येथील सिद्धार्थ प्रतिष्ठान बुद्ध विहार येथे पार पडलेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली.
या निवडीत तालुका महिला अध्यक्षपदी वैशाली उर्फ वर्षा सुनील गंगावणे (वांगणी) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जुन्या कार्यकारणीचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नव्या कार्यकारणीची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
जिल्हा पूर्व महिला अध्यक्षा सुजाताताई ओव्हाळ, सरचिटणीस मंजुषाताई धावारे आणि संघटक शालिनीताई रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली इच्छुक महिलांचे अर्ज स्वीकारून मुलाखतीद्वारे सक्षम टीमची निवड करण्यात आली.
महत्त्वाच्या नियुक्त्या :
सरचिटणीस – काजल ओमकार कांबळे (मार्गासनी)
कोषाध्यक्ष – शिल्पा किरण भिंगारे (खामगाव)
उपाध्यक्षपदी कोमल आकाश कांबळे, कविता बाबुराव गंगावणे आणि नूतन संतोष गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सचिव म्हणून मधुश्री समीर कांबळे, अर्चना रविराज गायकवाड, वैशाली प्रभाकर हांडे, वैशाली चंद्रकांत गायकवाड, पूजा संजय गायकवाड आणि उज्वला नवनाथ गंगावणे यांची निवड झाली असून कार्यालयीन सचिवपदी पल्लवी विशाल गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. हिशोब तपासणीसाठी रिया संपत भिंगारे काम पाहणार आहेत.
संघटकांची जबाबदारी :
संघटक पदाची धुरा स्वाती कैलास गायकवाड, गौरी प्रदीप कांबळे, हर्षल अनिल भिंगारे, सारिका किरण आल्हाट, निर्मला विलास गायकवाड, दीपमाला सनी गायकवाड यांच्यासह एकूण २१ महिलांवर सोपवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, चक्रवर्ती सम्राट अशोक जयंतीचे औचित्य साधून या कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील काळात धम्म प्रचार व सामाजिक कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.










