आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

हभप आशा हनमघर यांना ‘शिवशाही वारकरी भूषण’ पुरस्कार संत साहित्य व कीर्तन सेवेसाठी शिवजयंती निमित्त गौरव


पानशेत (प्रतिनिधी) : शंकर ढेबे 

संत साहित्य अभ्यासक व प्रख्यात किर्तनकार हभप आशा अक्षय हनमघर यांना यंदाचा ‘शिवशाही वारकरी भूषण’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. वारकरी संप्रदायातील उल्लेखनीय कार्य, संत साहित्याचा सातत्यपूर्ण अभ्यास तसेच समाजप्रबोधनात्मक कीर्तन सेवेमुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवशाही संघटना महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने दि. १९ रोजी कात्रज येथील दत्तनगर चौक येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पुणे जिल्ह्यातील वारकरी भूषण पुरस्कार हभप आशा हनमघर यांना प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

 

हभप आशा हनमघर या संत साहित्याच्या अभ्यासक म्हणून ओळखल्या जात असून त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये अध्यात्म, संस्कार व वारकरी परंपरेचे विचार रुजविण्याचे कार्य सातत्याने केले आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यभरात त्यांच्या कीर्तनांना मोठी उपस्थिती लाभत असून वारकरी संप्रदायाच्या जतन व प्रसारासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते.

 

या कार्यक्रमाला शिवशाही संघटनेचे अध्यक्ष अमित थोपटे, सचिन मांगडे, संतोष साळेकर, हभप शंकर मरगळे महाराज, भाजप नेते रोहीदास चोरघे, सुभाष कुमकर, राजेंद्र पवळे, संतोष थोपटे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, शिवभक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमात मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श समाजाने अंगीकारावा, तसेच वारकरी परंपरेतून समाजप्रबोधनाची परंपरा अधिक बळकट व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. पुरस्कार स्वीकारताना हभप आशा हनमघर यांनी हा सन्मान वारकरी संप्रदायातील सर्व संत-भक्तांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!