आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

नसरापूर–वेल्हा रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत; अन्यथा आंदोलनाचा इशारा


नसरापूर (वार्ताहर) : नसरापूर–वेल्हा मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली असल्याने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वेल्हे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यालयात निवेदन देण्यात आले.

 

निवेदनात म्हटले आहे की, शिवगंगा पुलापासून दिडघरपर्यंत तसेच करंजावणे ते वेल्हा या दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, शेतकरी व नागरिक प्रवास करतात. नसरापूर बाजारासाठी येणाऱ्या शेतकरी वर्गालाही या खराब रस्त्याचा मोठा फटका बसत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून वाहतूक संथ गतीने चालते. अनेक वेळा वाहतूक कोंडीचीही समस्या निर्माण होत आहे.

 

या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तसेच नागरिकांना कायमस्वरूपी दुखापत किंवा अपंगत्व येण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

जर आठ दिवसांच्या आत नसरापूर–वेल्हा रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

 

यावेळी तालुका प्रमुख दशरथ गोळे, युवा नेते सचिन बांदल, उपतालुका प्रमुख निलेश मुजुमले, विभाग प्रमुख सूरज लिम्हण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच हे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग, वेल्हे येथील उपअभियंत्यांना देण्यात आले.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!