आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

विंझर गावात विकासकामांना वेग घरकुल योजनांसह विविध कामांमुळे गावाच्या कायापालटाला सुरुवात


प्रतिनिधी : महेश सनस | विंझर (ता. वेल्हे)

वेल्हे तालुक्यातील विंझर गावात सुरू असलेल्या विकासकामांना सध्या मोठी गती मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत असून आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे अनेक प्रलंबित कामे मार्गी लागत असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

भोर-राजगड-मुळशी मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून पायाभूत सुविधा, घरकुल योजना तसेच गावाच्या मूलभूत गरजांशी संबंधित कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. स्थानिक स्तरावर अमोल शेठ नलावडे, संतोष आप्पा दसवडकर, किरण राऊत, अंकुश अण्णा दसवडकर आणि सरपंच सविता ताई लिम्हण यांच्या समन्वयातून विकासकामे वेगाने पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

 

विशेषतः घरकुल योजनेच्या कामावर भर देण्यात आला असून संतोष आप्पा दसवडकर यांनी स्वतः पुढाकार घेत लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रत्यक्ष पाहणी व आढावा बैठका सुरू केल्या आहेत. लाभार्थ्यांच्या अडचणी तत्काळ सोडवून कामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवला जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

 

मार्च अखेरपर्यंत सर्व प्रलंबित घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने स्थानिक नेतृत्वाने घेतलेला पुढाकार हा आदर्श ग्रामविकासाचा नमुना ठरत असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

 

विकासकामांच्या या गतीमुळे विंझर गावाचा सर्वांगीण कायापालट होत असून आगामी काळात गाव अधिक सक्षम व सुविधायुक्त बनण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!