आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

विंझर येथे ‘कृषी अवजार बँक’ योजनेचे लोकार्पण; शेतीतील यांत्रिकीकरणाला मिळणार चालना डोंगराळ व दुर्गम वेल्हे तालुक्यात मजूर टंचाईवर उपाय; शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह विविध अवजारे उपलब्ध


राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत वेल्हे तालुक्यातील विंझर येथे ‘कृषी अवजार बँक’ उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध होणार असून, शेतीतील कामे कमी वेळेत आणि कमी खर्चात पूर्ण करणे शक्य होणार आहे.

या उपक्रमांतर्गत लाभार्थी सौ. सुभद्रा बाळू भोसले व त्यांच्या बचत गटाला शेतीसाठी उपयुक्त विविध यंत्रसामुग्रीचे वाटप करण्यात आले. पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय पाचोळे यांनी विंझर गावाला भेट देऊन अवजारांची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी बोलताना पाचोळे म्हणाले की, वेल्हे तालुका हा डोंगराळ आणि दुर्गम भाग असल्यामुळे येथे शेतीकामासाठी मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवते. अशा परिस्थितीत कृषी यांत्रिकीकरण ही काळाची गरज असून, या योजनेमुळे शेतकऱ्यांचे श्रम व वेळ वाचून शेती उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.

तालुक्यातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी यंदा सहा लाभार्थी व गटांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. कृषी अवजार बँकेच्या माध्यमातून ट्रॅक्टर, नांगर तसेच इतर शेतीसाठी लागणारी अवजारे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी सुनील इडोळे, मंडळ कृषी अधिकारी भोसले साहेब, सहाय्यक कृषी अधिकारी रमेश बेलेकर, बीटीएम अबदागिरे साहेब, बचत गट अध्यक्ष गणेश भोसले तसेच लाभार्थी सौ. सुभद्रा भोसले, रमेश भोसले, सतीश भोसले, अजय भोसले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विंझर व परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामुग्रीचा लाभ मिळणार असून, शेती व्यवसायाला नवी गती मिळेल अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!