महिला दिनाचे औचित्य साधत नसरापूरमध्ये तायक्वांदो स्पर्धेचा थरार रंगला आणि परिसरातील खेळाडूंना आपल्या कौशल्याची चमक दाखवण्याचे उत्तम व्यासपीठ मिळाले. ‘युनिक तायक्वांदो फाउंडेशन चॅम्पियनशिप 2026’ ही स्पर्धा रविवारी (दि. 22 मार्च) कुंभारकर लॉन्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या हस्ते करण्यात आले. महिला पोलीस, महिला वनरक्षक, महिला वकील, महिला आरोग्य विभागातील प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्त्या पुनम मांगले, विद्या गेंगजे, प्रिया वायदंडे, मनीषा चौधरी, वैष्णवी ढाळे, बिराजदार मॅडम, अनुराधा कदम, अक्षदा तिखाळे, स्मिता विभुते, मधुरा शेटे व अनिता गोळे यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष शोभा आली.

स्पर्धेत विविध गटांतील खेळाडूंनी जोशपूर्ण खेळ करत ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार पटकावले. काव्या चव्हाण (शिवापूर), तन्वी पांगारे (दिवळे), रेणू यादव (पळशी, खंडाळा), अर्णव भगत (नसरापूर), वेदांत पिसाळ (पळशी, खंडाळा) व आरोही कानडे (पळशी, खंडाळा) यांना प्रत्येकी १,१११ रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच परिणीता डिंबळे, कृष्णा शेटे, पूर्वा मेमाने, मनस्वी गिऱ्हे व आदित्य खाटपे यांना बेस्ट फायटर ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

ग्रुप स्पर्धेत नसरापूर क्लबने अव्वल स्थान पटकावत ११,१११ रुपयांचे पारितोषिक मिळवले. दिवळे क्लबने द्वितीय (७,७७७ रुपये), शिवापूर क्लबने तृतीय (४,४४४ रुपये) तर कापूरहोळ क्लबने चतुर्थ (३,३३३ रुपये) क्रमांक मिळवला. ‘लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल, पळशी’ यांना बेस्ट क्लब ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक दात्यांनी उदार हस्ते सहकार्य केले. रूपाली काकी रमेश बापू कोंडे, पोपट नाना सुके, वन अधिकारी कार्यालय नसरापूर, अनिता गोळे, डॉ. सविता डिंबळे, मधुरा शेटे, ज्ञानेश्वर झोरे, अथर्व वनारसे, वैशाली झोरे, स्मिता विभुते, विशाल शिंदे, रेखा गिऱ्हे, प्रज्योत कदम, गुंजन कदम, नंदकुमार काजळे, सुधीर वाल्हेकर तसेच अर्चना वाघमारे, अजर तांबोळी, ज्योती चव्हाण, धनंजय गायकवाड व उषा कदम यांनी विविध स्वरूपात योगदान दिले.

विजेत्या खेळाडूंना सुनिता ताई चंद्रकांत बाठे यांच्या हस्ते पदके प्रदान करण्यात आली. शलाका ताई कुलदीप कोंडे यांनी ५,००० रुपयांची आर्थिक मदत केली, तर अजिंक्य हाडके यांनी खेळाडूंना खाऊ वाटप केले.
बक्षीस वितरण समारंभ मा. श्री. चंद्रकांत बाठे, लखन दादा दळवी, हेमंत भरगुडे सर, किरण बदे (पत्रकार), धनंजय भोसले (वसुंधरा फाउंडेशन), गणेश दळवी, सुरेश काळे, नंदकुमार काजळे, अथर्व वनारसे, अक्षय कदम, गुंजन कदम, धनंजय गायकवाड, ज्योती चव्हाण, उषा कदम, वैशाली झोरे व सुधीर वाल्हेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
गेल्या तीन वर्षांपासून महिला दिनानिमित्त या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून, यावर्षी फाउंडेशनचे अध्यक्ष निलम निकम जितेंद्र भगत व पत्रकार विशाल शिंदे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम यशस्वी झाला. महसूल, वन, पोलीस, आरोग्य, महावितरण व तहसील विभागातील महिलांचा सन्मान करण्यात आल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली क्रीडा गुणवत्ता सादर करण्याची संधी मिळाली असून, विशेषतः मुलींना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमास पोलीस पाटील संगीता मोरे व शितल शिळीमकर यांचीही उपस्थिती होती.
सौजन्य : विघ्नहर्ता सेवा प्रतिष्ठान










