आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

वेळू गणात शिवसेनेचा नवा चेहरा उदयास — रोहिदास (आबा) कोंडे यांची उमेदवारी चर्चेत


 

भोर तालुका : प्रतिनिधी विलास धोंगडे नसरापुर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यातील वेळू गणात राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हा युवासेना सचिव आणि युवा नेतृत्व रोहिदास (आबा) कोंडे यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारीची इच्छा व्यक्त करताच स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

गेल्या दोन दशकांपासून सातत्याने सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांत सक्रिय राहिलेल्या आबा कोंडे यांची ओळख आज एक निष्ठावंत, प्रामाणिक आणि कार्यक्षम शिवसैनिक म्हणून झाली आहे. मौजे कासुर्डी खे.बा (ता. भोर, जि. पुणे) येथील रहिवासी असलेले कोंडे हे “शिवभूमी सेवा संघटनेचे” संस्थापक-अध्यक्ष असून, युवकांना समाजकार्याच्या प्रवाहात आणण्याचे आणि संघटनात्मक एकजुटीचे कार्य त्यांनी मोठ्या उत्साहाने पार पाडले आहे.

कोंडे यांनी वेळू, शिंदेवाडी, कासुर्डी, रांजे, कुसगाव, खोपी, शिवरे, वरवे, कांजळे आदी गावांमध्ये जनसंपर्काचे भक्कम जाळे निर्माण केले असून, सामान्य नागरिकांच्या समस्या आणि शासकीय पातळीवरील मागण्यांसाठी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. गावोगावी ते फक्त राजकारणापुरते मर्यादित न राहता सामाजिक जाणिवांनी कार्यरत राहिले आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी आणि विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून, पक्ष संघटनेला बळकटी देण्याच्या कामात ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यशैलीतील परखडपणा, निर्भीड भूमिका आणि संघटनात्मक समन्वय कौशल्यामुळे पक्षातील तरुणांना नवे प्रेरणास्थान मिळाले आहे.

स्थानिक पातळीवर पक्षनिष्ठा आणि जनाधार या दोन्ही आघाड्यांवर कोंडे यांचे योगदान लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळेच भोर पंचायत समितीच्या वेळू गणासाठी ते सक्षम पर्याय ठरू शकतात, अशी चर्चा सध्या पक्षाच्या गोटात सुरू आहे. अनेकांनी त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी पक्षाच्या वरिष्ठांकडे केली आहे.

> “वेळू गणात जनतेशी थेट संवाद साधणारा, लोकांशी नाळ जोडलेला आणि शिवसेनेच्या तत्त्वांशी निष्ठावंत असा युवा चेहरा म्हणून रोहिदास (आबा) कोंडे यांच्याकडे पाहिले जात आहे,” असे स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे.

सध्या सुरू असलेल्या चर्चांमुळे वेळू गणातील राजकीय वातावरण तापले असून, शिवसेनेच्या उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय स्थानिक तसेच जिल्हास्तरीय पातळीवर उत्सुकतेचा विषय ठरला आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!