आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

सामुदायिक श्रीकृष्ण–तुळशी विवाह सोहळा नायगाव येथे उत्साहात संपन्न  एकी, परंपरा आणि सामाजिक सलोखा जपणारा सुंदर उपक्रम


भोर -नायगाव (प्रतिनिधी) : विलास धोंगडे नसरापूर

सालाबादप्रमाणे याही वर्षी दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी नायगाव ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून पारंपरिक आणि धार्मिक वातावरणात सामुदायिक श्रीकृष्ण–तुळशी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे आयोजन अखिल महिला मंच नायगाव, भजनी मंडळ नायगाव, सर्व तरुण मंडळ नायगाव आणि ग्रामपंचायत नायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

या सोहळ्यामुळे समाजामध्ये एकीची भावना, परंपरा आणि सहकार्याचे संस्कार दृढ होतात, तसेच पुढील पिढीपर्यंत भारतीय संस्कृतीतील मूल्ये पोहोचविण्याचे कार्यही या उपक्रमातून साधले जाते. विवाह सोहळ्याचे पारंपरिक विधी कीर्तन, भजन आणि मंगलाष्टकांच्या गजरात पार पडले. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विशाल हॉटेल (केळवडे) चे सर्वेसर्वा विशाल उर्फ बंटी शेठ कोंडे यांनी सर्व पाहुण्यांचे आणि मंडळ सदस्यांचे स्वागत केले. तर राजतोरण मिसळ हाऊस (दीडघर) चे सर्वेसर्वा सचिन अण्णा बांदल यांनी वधू–वरांना शुभाशिर्वाद देत समाजातील अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.

यावेळी निलेश आबासो कोंढाळकर, अंकुश तात्या सावंत यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. महिलांच्या सहभागामुळे सोहळ्याला वेगळीच शोभा आली.

श्रीकृष्ण–तुळशी विवाहानंतर प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. भक्ती, एकता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा सामुदायिक विवाह सोहळा नायगाव ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांचा एक प्रेरणादायी नमुना ठरला.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!