आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

वेळू–नसरापूर गटातून माऊली चव्हाण यांची जोरदार उमेदवारी तयारी जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून वाढत आहे पाठिंबा


 

नसरापूर : विलास धोंगडे

वेळू–नसरापूर जिल्हा परिषद गटातून येणाऱ्या निवडणुकीत माऊली सुभाष चव्हाण यांनी उमेदवारी दाखल करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून ते समाजकार्यात सक्रिय असून, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढा देणारे, उपक्रमशील आणि लोकसहभागावर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या गटातील जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने माऊली चव्हाण यांना उमेदवारीची संधी मिळत आहे. स्वतः ओबीसी समाजातील कार्यकर्ते असल्याने त्यांच्या उमेदवारीला स्थानिक समाजघटकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. नसरापूर बाजारपेठेतील रहिवासी आणि व्यावसायिक म्हणून त्यांनी पंचक्रोशीतील नागरिकांशी घट्ट संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यांच्या संवादशील व लोकाभिमुख स्वभावामुळे ते स्थानिक पातळीवर लोकप्रिय झाले आहेत.

त्यांच्या आई सौ. ज्योती सुभाष चव्हाण या नसरापूर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच राहिल्याने समाजकार्यातील अनुभव आणि चव्हाण कुटुंबाचा वारसा हा त्यांच्या राजकीय वाटचालीला बळकटी देणारा घटक ठरत आहे. माऊली चव्हाण यांनी गावातील युवकांना विविध सामाजिक उपक्रमांत सहभागी करून घेतले असून, महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणींवर त्यांनी नेहमीच संवेदनशीलतेने प्रतिसाद दिला आहे.

गावातील नागरिकांमध्ये “आपल्या गावातीलच उमेदवार असावा” अशी भावना व्यक्त होत असून, माऊली चव्हाण हे सर्वसामान्य कुटुंबातील आणि लोकांच्या मनातील उमेदवार म्हणून उभे राहत आहेत. त्यांच्या प्रचाराची सुरूवात स्थानिक पातळीवर जोमात सुरू असून, वेळू–नसरापूर गटात चुरस वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

सर्व समाजघटकांचा वाढता प्रतिसाद आणि माऊली चव्हाण यांची सातत्याने चाललेली कार्यशैली पाहता, या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरत आहे. स्थानिक जनतेच्या अपेक्षांशी निगडित प्रश्नांना प्राधान्य देऊन जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा त्यांचा निर्धार आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!