आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

तेलवडी हद्दीत तरुणावर चौघांकडून बेदम मारहाण; दगडाने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी


भोर तालुक्यातील तेलवडी गावाच्या हद्दीत भरदिवसा घडलेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कासुर्डी–मोहरी ये-जा करणाऱ्या रस्त्यालगत देवराई फार्मसमोर एका तरुणावर चौघा जणांनी मिळून अमानुष मारहाण केल्याची घटना दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी सचिन शंकर बिरामणे (वय २९, व्यवसाय शेती, रा. मोहरी बु., ता. भोर, जि. पुणे) यांनी राजगड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

फिर्यादी सचिन बिरामणे हे तेलवडी गावच्या हद्दीतून जात असताना, तेथे आधीच दबा धरून बसलेल्या

संशयित आरोपी

शिवम दत्तात्रय झांजले,

दत्तात्रय बाळु लेकावळे,

सिद्धार्थ दत्तात्रय झांजले,

दत्तात्रय गणपत झांजले

(सर्व रा. मोहरी खु., ता. भोर, जि. पुणे)

या चौघांनी एकत्र येत सामाईक उद्देशाने त्यांच्यावर हल्ला केला.

प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपींनी फिर्यादीस हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर संशयित आरोपी शिवम झांजले याने रस्त्याच्या कडेला पडलेला दगड उचलून सचिन बिरामणे यांच्या तोंडावर व नाकावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांना जबर दुखापत झाली आहे. यावेळी संशयित आरोपींनी “तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर जखमी सचिन बिरामणे यांनी उपचार घेतल्यानंतर रात्री उशिरा राजगड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. प्रकरणाची नोंद रात्री १०.४६ वाजता करण्यात आली.

या घटनेचा तपास पोलीस हवालदार निंबाळकर करत असून, संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदारांच्या आधारे पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. भरदिवसा सार्वजनिक रस्त्यावर घडलेल्या या हिंसक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!