आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

खानापूरच्या महात्मा गांधी विद्यालयात मानक लेखन स्पर्धेचे आयोजन


खानापूर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालय, खानापूर येथे भारतीय मानक ब्युरो (BIS) यांच्या स्टँडर्ड्स क्लब उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी मानक लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये दर्जेदार व सुरक्षित वस्तूंचा वापर, ग्राहक जागरूकता आणि दैनंदिन जीवनातील मानकांचे महत्त्व याबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शिवराम साबळे, स्टँडर्ड्स क्लबच्या मेंटोर मीरा कदम, विज्ञान शिक्षिका नूतन ओतूरकर, रमेश कोळी तसेच ज्येष्ठ शिक्षिका ज्योत्स्ना गुरव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात BIS मानक गीताने करण्यात आली.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्टँडर्ड्स क्लबच्या मेंटोर मीरा कदम यांनी विद्यार्थ्यांना भारतीय मानक ब्युरो अर्थात BIS च्या कार्याची सविस्तर माहिती दिली. वस्तूंचा दर्जा, सुरक्षितता, प्रमाणित वस्तूंचा वापर, ग्राहक म्हणून घ्यावयाची काळजी तसेच दैनंदिन जीवनात भारतीय मानकांची असलेली आवश्यकता याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले.

 

दैनंदिन जीवनात आपण विविध वस्तूंचा वापर करतो. त्या वस्तूंचा दर्जा व सुरक्षितता याबाबत जागरूक राहणे आवश्यक असून, मानके ही केवळ उद्योग किंवा उत्पादकांसाठी नसून प्रत्येक ग्राहकाच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना BIS आणि मानकांच्या महत्त्वाची सखोल माहिती मिळाली.

 

यावेळी विद्यार्थ्यांनी BIS संदर्भातील माहिती जाणून घेतली. तसेच मानक लेखन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या स्वरूपाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षिका ज्योत्स्ना गुरव आणि विज्ञान शिक्षिका नूतन ओतूरकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवराम साबळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला चालना मिळते, तसेच विविध विषयांकडे चिकित्सक आणि जागरूक दृष्टिकोनातून पाहण्याची सवय लागते, असे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना मानक लेखन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

यानंतर स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या स्टेशनरी साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण व पर्यवेक्षण श्रीमती नूतन ओतूरकर आणि श्री. रमेश कोळी यांनी केले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवराम साबळे, मार्गदर्शक मीरा कदम, लेखनाचे परीक्षण करणारे रमेश कोळी, नूतन ओतूरकर, विद्यालयातील संपूर्ण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच BIS स्टँडर्ड्स क्लबचे मार्गदर्शक श्री. शुक्ला सर यांचे सहकार्य लाभले. याबद्दल आयोजकांकडून सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

 

तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अधीक्षक मा. किरण देशपांडे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याबद्दल विशेष आभार मानण्यात आले.

 

विद्यार्थ्यांना भारतीय मानकांचे महत्त्व समजावे, त्यांच्यामध्ये ग्राहक म्हणून आवश्यक असलेली जागरूकता निर्माण व्हावी आणि भविष्यात दर्जेदार व सुरक्षित उत्पादनांची निवड करण्याची सवय लागावी, या दृष्टीने आयोजित करण्यात आलेली ही मानक लेखन स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!