भोर तालुका : विलास धोंगडे
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधूमाळी समीप येत असताना कामथडी–भोंगवली तसेच वेळू–नसरापूर या दोन्ही महत्त्वाच्या गटांमध्ये भाजप तिकिटासाठी अभूतपूर्व स्पर्धा पाहायला मिळत आहे. इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या, त्यांची सक्रियता, संघटनात्मक काम आणि स्थानिक जनाधार यांच्या पार्श्वभूमीवर तिकीट कोणाला मिळणार, याकडे तालुक्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
पक्षाकडे अधिकृतपणे अर्ज दाखल झाल्याने स्थानिक राजकारणात चैतन्य निर्माण झाले असून गटागटात तर्क–वितर्क सुरू झाले आहेत.
कामथडी–भोंगवली गट : जिल्हा परिषद व पंचायत समिती तिकिटांवर तगडी चुरस
जिल्हा परिषदेसाठी इच्छुक (कामथडी–भोंगवली गट)
1. रोहन बाठे
2. महेश टापरे
3. महादेव सोनवणे
4. राहुल लेकावळे
या चारही उमेदवारांनी मागील काही वर्षांत गावोगावी संपर्क वाढवून, सामाजिक कामे करत प्रभावी उपस्थिती निर्माण केली आहे. या सर्वांची वेगवेगळी बलस्थाने असल्याने पक्षाला अंतिम नाव ठरवताना व्यापक विचार करावा लागणार आहे.
भोंगवली गणातील पंचायत समिती इच्छुक
1. विनोद चौधरी
2. तुषार मालुसरे
3. महेश धाडवे
4. वसंत परबळ
या गणात चारही इच्छुक नेहमीच लोकांमध्ये कार्यरत असल्याने पंचायत समिती तिकिटासाठी येथे तीव्र स्पर्धा दिसत आहे.
कामथडी गणातील पंचायत समिती इच्छुक
1. हेमलता संतोष धावले
2. नीता इंगुळकर
3. प्राजक्ता सुनील पांगारे
4. रेशमा बांदल
5. सोनम गोळे
6. शशिकला गोरड
या गणात महिलांची संख्या सर्वाधिक असून पक्षाच्या ‘महिला सक्षमीकरणा’वर आधारित धोरणामुळे या गटातील तिकीटवाटप अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे. प्रत्येक उमेदवार गावपातळीवर सक्रिय असल्याने अंतिम निवड संवेदनशील बनली आहे.
वेळू–नसरापूर गट : जिल्हा परिषद तिकिटावर सर्वांचे कानोसा
जिल्हा परिषदेसाठी इच्छुक (वेळू–नसरापूर गट)
1. जीवन आप्पा कोंडे
2. पोपटराव सुके
3. लहू नाना शेलार
4. चंदू भैया परदेशी
5. माऊली तात्या पांगारे
या गटातील सर्वच उमेदवारांचे भक्कम जनाधार असला तरी लहू नाना शेलार आणि जीवन आप्पा कोंडे यांच्यामध्ये तिकिटाची तीव्र रस्सीखेच होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
दोघेही प्रभावी, जनाधारसंपन्न आणि राजकीयदृष्ट्या वजनदार नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

स्थानिक पातळीवरील त्यांच्या मजबूत पकडीमुळे या दोन उमेदवारांपैकी कोणाला पक्ष तिकीट देणार, यावर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
विशेष म्हणजे, जीवन आप्पा कोंडे यांना अलीकडील जनसंपर्क दौऱ्यांमध्ये जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याच्या चर्चा स्थानिक वर्तुळात जोरात आहेत.
शेलार यांची संघटनात्मक पकड देखील भक्कम असल्याने या दोन नावांवर गटातील राजकारण अधिक रंगतदार झाले आहे.
वेळू गणातील पंचायत समिती इच्छुक
1. अशोकराव वाडकर
2. निलेश भोरडे
3. अभिजीत कोंडे
4. शिवाजीराव कामठे
या गणात सर्व उमेदवार गावागावात सक्रिय असल्याने पक्ष निर्णय कोणाच्या बाजूने करतो हे महत्त्वाचे ठरणार आहे.
नसरापूर गणातील पंचायत समिती इच्छुक
1. सुधीर वामन शेडगे
2. सुरज मरळ
3. संदीप शिळीमकर
4. भरत शेटे
5. दत्तात्रय कोंडे
6. गणेश दळवी
7. अमोल भाऊ शिळीमकर
या गणात सर्वाधिक सात उमेदवार असल्याने स्पर्धा अत्यंत तीव्र आहे. नसरापूरचा राजकीय प्रभाव पाहता हे तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारांमध्ये मोठी चुरस आहे.
पक्षाचा कल कोणाकडे?
भाजपकडून तिकीट ठरवताना खालील मुद्द्यांवर विशेष भर दिला जाणार असल्याची चर्चा आहे :
स्थानिक जनाधार
जिंकण्याची क्षमता
संघटनात्मक कार्य
समाजातील प्रतिमा
कार्यकर्त्यांचा पाठिंबा
गावपातळीवरील सक्रियता
या सर्वांचा विचार करूनच अंतिम उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे.
निर्णयाकडे सर्वांचे डोळे
कामथडी–भोंगवली तसेच वेळू–नसरापूर या दोन्ही गटांत मजबूत आणि अनुभवी इच्छुक असल्याने या वेळीची तिकिटवाटप प्रक्रिया संपूर्ण तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
कोणाला तिकीट मिळणार आणि कोण पुढील राजकीय वाटचालीत नवा अध्याय सुरू करणार—याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










