भोर प्रतिनिधी : विलास धोंगडे
खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ अज्ञात चोरट्याने ५० हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शहाजी पिराजी कांबळे (वय ४७, रा. बांडेवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची होंडा कंपनीची सीबी शाईन मोटारसायकल (क्रमांक एमएच १४ जी ५२३४, ग्रे रंग) ही दि. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११.३० वाजता ते दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंतच्या दरम्यान, खेड-शिवापूर टोलनाक्याजवळून अज्ञात इसमाने चोरून नेली.
सदर मोटारसायकलची किंमत सुमारे ५०,००० रुपये इतकी असून चोरीच्या या घटनेमुळे फिर्यादीला आर्थिक तोटा झाला आहे. या संदर्भात पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध BNS कलम ३०३(२) नुसार गुन्हा क्रमांक ४०२/२०२५ दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक मेस्त्री (बकल नंबर २६२६) हे तपासी अंमलदार करत असून प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. राजगड पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.










