आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

गो-हे खुर्द येथे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरास उत्साहात सुरुवात


 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हुजरपागा श्रीमती दुर्गाबाई मुकुंददास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालय, लक्ष्मी रोड, पुणे यांच्या विद्यमाने गो-हे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात विशेष सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरास उत्साहात सुरुवात झाली.

 

या शिबिरामध्ये ग्रामीण विकासाशी निगडित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यात मतदान जनजागृती, महिला आरोग्य शिबिर, ग्रामस्वच्छता मोहीम, सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण, मान्यवरांची व्याख्याने तसेच सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आणि ग्रामजीवनाशी प्रत्यक्ष संवाद साधणे, हा शिबिराचा मुख्य उद्देश आहे.

 

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी शालिनी पाटील होत्या. यावेळी माजी सरपंच लक्ष्मण माताळे, तानाजी खिरिड, माधुरी पारगे व अरुणा भामरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत श्रमसंस्कार शिबिरातून सामाजिक जाणिवा, नेतृत्वगुण आणि स्वयंसेवेची भावना विकसित होत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील प्रश्न समजून घेऊन त्यावर सकारात्मक उपाय सुचविण्यासाठी अशा उपक्रमांचा मोठा फायदा होतो, असेही त्यांनी नमूद केले.

 

या कार्यक्रमास बाबासाहेब पारगे, त्रिंबक मोकाशी, राजेंद्र पवार, सरपंच अमृता माताळे, युवा अध्यक्ष संघदीप शेलार, शशीकांत किवळे, पो. पाटील कालिदास माताळे, कालिदास ढमढेरे, निर्मला बोडरे, दिलीप माताळे, सारिका माताळे, लक्ष्मी माताळे, अरुण माताळे आदी मान्यवरांसह एनएसएसचे स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग व स्वयंसेवक परिश्रम घेत असून, एनएसएस कॅम्पच्या प्रमुख माने मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. आगामी सात दिवसांत विविध सामाजिक उपक्रमांद्वारे गावातील नागरिकांशी थेट संवाद साधत विद्यार्थ्यांकडून श्रमदान व जनजागृतीचे कार्य केले जाणार आहे.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!