भोर (प्रतिनिधी) : विलास धोंगडे नसरापूर
भोर तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील चेलाडी फाटा ते बनेश्वर मंदिर या रस्त्यावर भूमिगत केबल टाकणे आणि लाईट शिफ्टिंग या अत्यंत महत्त्वाच्या विकासकामाचा शुभारंभ व भूमिपूजन सोहळा मंगळवार, दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला.
जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत मंजूर झालेल्या या कामासाठी एकूण अंदाजपत्रक रक्कम रुपये १,१८,६०,६९३ इतकी असून, या कामाची जबाबदारी अग्रवाल इलेक्ट्रिकल्स अँड वर्क्स, निरा (ता. पुरंदर, जि. पुणे) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
या कामासाठी सरपंच सौ. उषा विक्रम कदम आणि माजी उपसरपंच श्री. संदीप शंकरराव कदम यांनी सातत्याने प्रयत्न आणि पाठपुरावा केला. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे हा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रकल्प मंजूर होऊन प्रत्यक्षात सुरू झाला आहे. या कामामुळे गावाच्या प्रकाशयोजना, सुरक्षितता आणि सौंदर्यवर्धनात मोठी सुधारणा होणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन नसरापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे भूमिपूजन मा. आमदार श्री. शंकरभाऊ मांडेकर (भोर-राजगड-मुळशी) यांच्या शुभहस्ते पार पडले. हा प्रकल्प मा. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
या प्रसंगी मा. श्री. विक्रम खुटवड (सदस्य, जिल्हा नियोजन समिती पुणे), मा. श्री. रणजीतदादा शिवतारे (उपाध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे), मा. श्री. चंद्रकांतदादा बाठे (जि.प. सदस्य), मा. श्री. संतोष घोरपडे (अध्यक्ष, भोर राष्ट्रवादी काँग्रेस), श्री. भालचंद्र भाऊ जगताप (तज्ञ संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक), श्री. विशाल (बंटी) कोंडे (अध्यक्ष, भोर युवक राष्ट्रवादी काँग्रेस) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदविला. उपसरपंच श्री. इरफान हबीब मुलाणी, मा. उपसरपंच श्री. नामदेव चव्हाण, श्री. गणेश दळवी, श्री. सुधीर वाल्हेकर, सौ. रोहिणी शेटे (मा. सरपंच), सौ. सपना झोरे (मा. सरपंच), सौ. अश्विनी कांबळे (ग्रा.पं. सदस्या), कु. श्रद्धा हाडके (ग्रा.पं. सदस्या), अॅड. मेघा लष्कर (ग्रा.पं. सदस्या), श्री. रुपेश हारपुडे (ग्रा.वि. अधिकारी) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे यश वाढविले.
या सोहळ्यास गावातील नागरिक, महिला मंडळे, युवक संघटना, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या उत्तम नियोजनामुळे व लोकसहभागामुळे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
या प्रकल्पामुळे चेलाडी फाटा ते बनेश्वर मंदिर रस्ता परिसरातील जुन्या वीजवाहिन्या भूमिगत केल्या जाणार आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील विजेच्या तारा जमिनीखाली गेल्याने अपघाताचा धोका कमी होईल, तसेच प्रकाशयोजना अधिक सुरक्षित आणि आकर्षक बनेल. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आधुनिक दिव्यांची व्यवस्था होणार असून, त्यामुळे परिसराचे सौंदर्य वाढणार आहे.
नसरापूर गावाच्या प्रगतीच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि स्थानिक नेतृत्वाच्या समन्वयातून नसरापूर गावाचा विकासाचा प्रवास आता अधिक वेगाने सुरू झाला आहे. या प्रकल्पामुळे विजेची सुरक्षितता आणि प्रकाशयोजनासंदर्भात नवी दिशा मिळणार आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास आमदार शंकरभाऊ मांडेकर, भालचंद्र भाऊ जगताप, संतोष घोरपडे, विक्रमदादा खुटवड, चंद्रकांतदादा बाठे, विशाल (बंटी) कोंडे, गणेश निगडे, ज्ञानेश्वर पांगारे, हनुमंत तात्या कदम, तसेच एमएसईबीचे बराबदेसाहेब, सरपंच सौ. उषा विक्रम कदम, नामदेव चव्हाण, संदीप कदम, सुधीर वाल्हेकर, रुपेश हारपुडे, भाऊसाहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
नसरापूर ग्रामसचिवालयासाठी भव्य बहुउद्देशीय इमारतीची मागणी 
दरम्यान, नसरापूर ग्रामपंचायतीतर्फे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे गावातील जुना वाडा इमारत धोकादायक झाल्याने ती पाडून त्या जागी भव्य बहुउद्देशीय ग्रामसचिवालय आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
सदर इमारतीत महसूल, पोलीस, आरोग्य, कृषी, अंगणवाडी, महिला बालकल्याण आणि पीएमआरडीएचे कार्यालये कार्यरत होती. मात्र, अतिवृष्टीमुळे जीर्ण झालेल्या या इमारतीचा धोका लक्षात घेता सर्व कार्यालये तात्पुरती स्थलांतरित करण्यात आली आहेत.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. पुणे यांच्या आदेशानुसार या इमारतीचे निर्लेखन सुरू असून, त्या जागेवर अंदाजे ५०० लाख रुपयांच्या खर्चाने ग्रामसचिवालय व व्यापारी संकुल उभारण्याचा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीच्या या दूरदर्शी निर्णयामुळे नसरापूरच्या नागरी विकासाला नवी दिशा मिळेल. गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांच्या सहभागातून नसरापूर विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे.
ही दोन महत्त्वाची कामे — भूमिगत केबल टाकणे व ग्रामसचिवालय प्रकल्प — नसरापूरच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिणारी ठरत असून, ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली गाव उजळून निघणार आहे.










