आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

तेलवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आरतीताई धावले — महिला सक्षमीकरण व ग्रामविकासाची नवी दिशा!


भोर तालुक्यातील तेलवडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) भोर तालुका युवती अध्यक्षा आरतीताई किरण धावले या नावाने ग्रामविकासाचा नवा अध्याय लिहिला आहे. आपल्या कार्यकाळात आरतीताईंनी महिला सक्षमीकरण, युवा विकास आणि ग्रामपातळीवरील सेवा उपक्रम या तीन प्रमुख स्तंभांवर काम करत ग्रामस्थांचा विश्वास जिंकला आहे.

 

आरतीताईंनी गावातील महिलांना स्वयंनिर्भरतेच्या मार्गावर नेण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून संघटित व प्रोत्साहित केलं आहे. विविध शासकीय योजनांची माहिती प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे काम आरतीताईंनी हाती घेतले आहे.

 

गावातील तसेच तेलवडी–कासुर्डी पंचक्रोशीतील तरुणांना खेळाच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग खुला करून देण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. कबड्डी, क्रिकेटसारख्या खेळांसाठी तरुण खेळाडूंना आर्थिक मदत व साहित्य पुरवून, त्यांच्या कौशल्याला चालना देण्याचे कार्य आरतीताई सातत्याने करत आहेत.

 

युवकांना प्रोत्साहन देतानाच आरतीताईंनी गावाच्या विकासकामांवरही ठोस लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या कार्यकाळात जलजीवन मिशनसह विविध पायाभूत सुविधा राबवून सुमारे 75 ते 80 लाख रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. यात रस्त्यांचे डांबरीकरण, पाणीपुरवठा व्यवस्था सुधारणा, आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारे अनेक उपक्रम सामावले आहेत.

 

ग्रामपातळीवर आरतीताईंनी सेवा उपक्रम, आरोग्य शिबिरे, स्वच्छता अभियान, तसेच नवीन सरकारी योजनांची जनजागृती अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून गावकऱ्यांचा सहभाग वाढवला आहे.

 

आज तेलवडी गावात आरतीताई धावले हे नाव संघटन, प्रामाणिकपणा आणि विकासाची हमी म्हणून ओळखले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली गावाने विकासाची नवी झेप घेतली असून, युवक आणि महिला या दोघांच्याही प्रगतीसाठी त्यांनी दिलेलं योगदान प्रेरणादायी ठरत आहे.

 

“विकासाच्या वाटचालीत प्रत्येकाच्या हाताला साथ — हा आरतीताईंचा खरा मंत्र!”


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!