आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

निगडे परिसरात पहाटे संशयित इसम ताब्यात; कारमधून कोयता जप्त


भोर : पुणे–सातारा महामार्गावरील निगडे परिसरात पहाटेच्या सुमारास संशयास्पद हालचाली करत बसलेल्या एका इसमाला राजगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित इसम हा मालमत्तेविरुद्ध गुन्हा करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 14 एप्रिल 2026 रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास निगडे (ता. भोर) गावच्या हद्दीत पुणे–सातारा हायवेवरील सर्व्हिस रोडजवळ एक इसम अंधारात कारजवळ बसलेला आढळला. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेत चौकशी केली.

 

चौकशीदरम्यान त्याने आपले नाव सेलवान सोलामुन (वय 36, रा. चेटटीकुलम, जि. नागरकोइल, तमिळनाडू) असे सांगितले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील कारची तपासणी केली असता वाहनामध्ये लोखंडी कोयता आढळून आला. त्याबाबत विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही.

 

या घटनेवरून संबंधित इसम हा कोणत्यातरी गुन्ह्याच्या उद्देशाने परिसरात दबा धरून बसल्याचा संशय पोलिसांना आला असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कोल्हे करीत असून राजगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे.


  • 👍
100
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!