आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

कामथडीजवळ ३३ केव्हीची तार तुटल्याने पाबे उपकेंद्र ठप्प! महावितरणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम; वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी लागणार ४ ते ५ तास


विंझर वार्ताहर | दि. ०९ : समीर कांबळे

कामथडी गावाजवळ ३३ केव्ही क्षमतेच्या पाबे वाहिनीची वीजवाहक तार अचानक तुटल्याने पाबे उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील गावांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांना अंधारात वेळ काढावी लागत आहे.

महावितरणच्या तांत्रिक पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. राजगड (वेल्हे) येथून अतिरिक्त कर्मचारी आणि साहित्य बोलावण्यात आले असून, तुटलेल्या तारेला जोडणी देण्यासाठी सर्व पथके युद्धपातळीवर काम करत आहेत.

या तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी अंदाजे ४ ते ५ तासांचा कालावधी लागणार असल्याची माहिती महावितरण, राजगड (वेल्हे) येथील सहाय्यक अभियंता सचिन कुलकर्णी यांनी दिली.

> “कामथडी गावाजवळ ३३ केव्ही वाहिनीची तार तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. आमचे कर्मचारी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करत आहेत. तांत्रिक अडचणींमुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही वेळ लागेल. नागरिकांची गैरसोय होत असल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. नागरिकांनी सहकार्य करावे,”

असे सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.

दरम्यान, या वीजपुरवठा खंडामुळे कामथडी, पाबे, वेल्हे, विंझर, भांडे, भटघर परिसरातील काही भागांमध्ये वीज नसल्याने घरगुती तसेच लघुउद्योगिक कामकाजावरही परिणाम झाला आहे. महावितरण प्रशासनाने सर्व संबंधितांना वीज उपकरणे सुरक्षित ठेवावीत आणि दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत संयम बाळगावा, असे आवाहन केले आहे.


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!