आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

विंझरच्या विकासाला नवी गती! ग्रामसेवकपदी संतोष शेळकंदे नियुक्त — ग्रामस्थांत उत्साह


राजगड, प्रतिनिधी महेश सणस दि. 21 : वेल्हे तालुक्यातील महत्वाच्या विंझर गावाला नवा ग्रामसेवक मिळाला असून, कार्यक्षम, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कामासाठी ओळखले जाणारे संतोष शेळकंदे यांची नुकतीच ग्रामसेवकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला वेग येईल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

 

यापूर्वी कार्यरत असताना त्यांनी अनेक गावांमध्ये स्वच्छता अभियान, पाणीपुरवठा योजना आणि विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. योजनांचे लाभ थेट लोकांपर्यंत पोहोचवण्यातील त्यांच्या काटेकोर कामपद्धतीमुळे ते प्रशासनात विशेष परिचित आहेत.

 

विकासाच्या दिशेने नव्या अपेक्षा

 

विंझर हे परिसरातील एक महत्त्वाचे केंद्र असल्याने, येथे रस्ते विकास, सांडपाण्याच्या व्यवस्थेतील सुधारणा, तसेच युवक व महिलांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधी वाढविण्यासाठी शेळकंदे विशेष प्रयत्न करतील, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

 

“शेळकंदे साहेब पारदर्शक व लोकाभिमुख काम करतील. त्यांच्या नेतृत्वाखाली विंझर गावाचा विकास वेगाने होईल, यात शंका नाही,” असे मत सरपंच सौ. सविताताई मोहन दसवडकर यांनी व्यक्त केले.

 

स्वागत व शुभेच्छा

 

नवनियुक्त ग्रामसेवक संतोष शेळकंदे यांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. पुढील कामकाजासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देत नव्या उमेदीने विकासाच्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या.


  • 👍

‘साहेबांच्या मर्जीतला’ तोतया पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कथित वरदहस्ताने अवैध व्यवसायांना अभय? राजगड पोलिस ठाणे पुन्हा चर्चेत; अवैध व्यवसायांवरून नागरिकांचे गंभीर सवाल काही दिवसांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्याचा कथित दरोडा प्रकरणाशी संबंध; आता अवैध व्यवसायांच्या चर्चेने खळबळ

109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

‘साहेबांच्या मर्जीतला’ तोतया पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कथित वरदहस्ताने अवैध व्यवसायांना अभय? राजगड पोलिस ठाणे पुन्हा चर्चेत; अवैध व्यवसायांवरून नागरिकांचे गंभीर सवाल काही दिवसांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्याचा कथित दरोडा प्रकरणाशी संबंध; आता अवैध व्यवसायांच्या चर्चेने खळबळ

error: Content is protected !!