वेल्हे (प्रतिनिधी): शंकर ढेबे
राजगड तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना कडवे आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्रित मोर्चा काढला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना (उबाठा), मनसे, काँग्रेस आय व वंचित बहुजन आघाडी या पाच प्रमुख पक्षांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त लढ्याचा निर्णय घेतला आहे.
शुक्रवार (दि. 14) रोजी वेल्हे येथील शिवगोरक्ष कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही भूमिका अधिकृतरीत्या निश्चित करण्यात आली. आघाडीतील सर्व पक्षांचा उमेदवार परस्पर सहमतीने निवडून तालुक्यात एकहाती सत्ता स्थापन करण्याचे लक्ष्य यावेळी ठरवण्यात आले.
सत्ताधारी पक्षात बंडखोरीची शक्यता
भाजप, राष्ट्रवादी (अजित गट) व शिवसेना हे पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. सत्ताधारी गटात अनेक इच्छुक असल्याने बंडखोरीचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे सत्ताधारी पक्षांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याउलट, एकत्रितपणे उभी ठाकलेली महाविकास आघाडी ही परिस्थिती आपल्या फायद्यात वळवू शकणार आहे.
“सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी एकजूट आवश्यक” – आघाडीची भूमिका
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी “सत्ता एकहाती मिळवायची असेल तर एकजूट हीच गरज” असे मत एकमुखाने नोंदवत संयुक्त लढाईवर शिक्कामोर्तब केले.
बैठकीस उपस्थित मान्यवर
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी कोलते, मनसे जिल्हा प्रमुख संतोष दसवडकर, शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख प्रकाश भेगडे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश वालगुडे, राष्ट्रवादी युवती अध्यक्षा दुर्गा चोरगे, राष्ट्रवादी (श. प.) तालुका अध्यक्ष शंकर भुरूक, मनसे तालुका प्रमुख दिगंबर चोरघे, शिवसेना (उबाठा) प्रमुख उमेश नलावडे, वंचित बहूजन आघाडीचे बाप्पु शिंदे, काँग्रेस आय अध्यक्ष संजय वालगुडे, पानशेत विभाग अध्यक्ष संपत मोरे, माजी तालुका प्रमुख दिपक दामगुडे, बाळासाहेब देशपांडे, बाप्पु शिर्के, गोरक्ष भुरूक, हनुमंत कार्ले, चेतन शिळीमकर, अमित माने, राहुल ठाकर, शिवाजी शेंडकर, विकास भिकुले आदी मान्यवर उपस्थित होते.










