उंबरे (ता. भोर) : प्रतिनिधी विलास धोंगडे
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उंबरे ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांच्या शुभारंभाचा भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. प्राथमिक शाळा ते आबुराव बाबुराव खुटवड वस्ती दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून या कामासाठी ₹10 लाख 50 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हा प्रमुख रमेश बाबू कोंडे, युवा नेते कुलदीप तात्या कोंडे (भोर–राजगड–मुळशी), अमोल भाऊ पांगारे (जिल्हा नियोजन समिती सदस्य), तसेच विशाल उत्तम खुटवड (शिवसेना) आणि रमेश धर्माजी खुटवड (शिवसेना) यांची उपस्थिती होती.
ग्रामपंचायत उंबरेच्या वतीने सरपंच गणेश सुरेश खुटवड, उपसरपंच गंगा दशरथ खुटवड, सदस्य बाळासाहेब खुटवड, वैशाली खुटवड, किशोरी खुडे, रामचंद्र खुटवड, नंदा पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तसेच नवनियुक्त चेअरमन अरुण आबा खुटवड यांचा सत्कार करीत गावाच्या विकासाबाबत आशादायी भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास गावातील तरुण वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. भैरवनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष सुरज खुटवड, तसेच उल्हास खुटवड, सुयश खुटवड, अनिकेत देवकर, आदित्य देवखुटवड, आकाश खुटवड, गोटू खुटवड, सोहम खुटवड, अक्षय खुटवड आदी तरुण उपस्थित होते.
रस्त्याचे काँक्रीटीकरण झाल्याने विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार असून गावाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात हा टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे.










