आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

राजगड तालुक्यात काँग्रेसची संघटन आढावा बैठक उत्साहात जिल्हा परिषद–पंचायत समितीसाठी मजबूत गटबांधणीचा निर्धार


राजगड प्रतिनिधी : समीर कांबळे

राजगड तालुक्यातील राजगड तालुक्यात काँग्रेसची संघटन आढावा बैठक उत्साहात जिल्हा परिषद–पंचायत समितीसाठी राजगड तालुक्यात काँग्रेसची संघटन आढावा बैठक उत्साहात जिल्हा परिषद–पंचायत समितीसाठी मजबूत गटबांधणीचा निर्धार बूत गटबांधणीचा निर्धार काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची आढावा बैठक मेंगाई देवीच्या मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण, पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते कमलाकर सातव, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष उमेश पवार तसेच ज्येष्ठ नेते दत्तोबा जाधव उपस्थित होते.

 

मान्यवरांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी वेल्हे–राजगड परिसरात काँग्रेस पक्षाला आलेली मरगळ झटकून संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. “सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करत आगामी निवडणुकांत काँग्रेसला बहुमताने यश मिळवून द्यावे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

 

या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. भोर–राजगड तालुक्यांमध्ये काँग्रेसची पारंपरिक व बलाढ्य मतदानशक्ती पुन्हा एकत्र करत मजबूत गटबांधणी करण्याचा ठाम निर्धार यावेळी करण्यात आला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत काँग्रेसचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व स्तरांवर नियोजनबद्ध काम करण्यावर एकमत झाले.

 

तालुका पातळीवरील संघटन अधिक सक्षम करण्यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय वालगुडे, युवक अध्यक्ष रामभाऊ रेणुसे विद्यार्थी अध्यक्ष गणेश गिरेंजे उपाध्यक्ष मारुती पानसरे, सचिव एकनाथ कडू, खजिनदार अनंता खोपडे, सरचिटणीस नितीन चोरगे, बाळासाहेब रेणुसे, अक्षय वालगुडे, , यांच्यासह सुनील शिं दे, सागर पानसरे, शेखर पानसरे, दत्ता वालगुडे, लक्ष्मण रेणुसे, अमृत सागर, संजय डांगे, अजय जांभळे, गणेश बोडके, नवनाथ ननावरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष गणेश गिरंजे यांनी सांगितले की, “यावेळी काँग्रेस पक्ष आपली संघटनात्मक ताकद दाखवून देईल. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे भरपूर उमेदवार निवडून आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहीन.”

या निर्धाराने राजगड तालुक्यात काँग्रेसने आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!